---Advertisement---

रिषभ पंत रिव्ह्यू सिस्टीम ऍक्टिवेट! अचूक निर्णय घेत डेविड मलानचा अडथळा केला दूर, बघा व्हिडिओ    

On: रविवार, मार्च 14, 2021 9:37 PM
---Advertisement---

रविवारी (१४ मार्च) भारत विरुद्ध इंग्लंड दरम्यान अहमदाबाद येथे दुसरा टी२० सामना पार पडला. या सामन्यात भारतीय खेळाडूंनी गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण विभागात चांगली कामगिरी केली.  यामुळे इंग्लंडचा डाव ६ बाद १६४ धावांवर संपुष्टात आला. दरम्यान यष्टीरक्षक रिषभ पंत याच्यात माजी भारतीय क्रिकेटपटू एमएस धोनीची झलक पाहायला मिळाली. त्याने अचूक रिव्ह्यू घेत भारतीय संघाला महत्त्वाची विकेट मिळून दिली.

प्रथम फलंदाजीला उतरलेल्या इंग्लंडला पहिल्याच षटकात झटका बसला. त्यांचा सलामीवीर जोस बटलर शून्यावर पायचित झाला. त्यानंतर जेसन रॉय आणि डेविड मलान यांनी चौफेर फटकेबाजी करत सामना आपल्या बाजूने फिरवला. डावातील आठव्या षटकापर्यंत त्यांची अर्धशतकी भागिरादीही पूर्ण झाली. अशात त्यांची जोडी तोडण्यासाठी कर्णधार विराट कोहलीने युझवेंद्र चहलचे अस्त्र वापरण्याचा निर्णय घेतला.

विराटने चहला डावातील नववे षटक टाकण्यासाठी पाठवले. चहलने अतिशय चपळतेने षटकातील पहिला चेंडू टाकला आणि मलानच्या पायाजवळून चेंडू गेला. यावर चहलने पंचांकडे जोरदार अपील केली. परंतु त्यांनी मलान नाबाद असल्याचे घोषित केले. यानंतर कर्णधार विराट रिव्ह्यू घेण्याच्या विचारात होता. मात्र यष्टीमागे उभा असलेल्या पंतने नकार दिल्याने त्याने माघार घेतली.

पुढे चहलने पुन्हा पुढील चेंडू अगदी त्याच पद्धतीने टाकला. यावेळीही चेंडू मलानच्या पायाला लागला. पण पंचांनी यावर कसलाही प्रतिसाद दिला नाही. अशात पंतने पुढाकार घेत कर्णधार विराटला रिव्ह्यू घेण्याचा इशारा केला. त्याच्या हावभावांवरुन तो आपल्या निर्णयाबाबत ठाम असल्याचे भासल्याने विराटने रिव्ह्यू घेतला आणि शेवटी पडताळणीनंतर पंचांनी मलान बाद असल्याचे जाहीर केले. अशाप्रकारे पंतच्या अचूक रिव्ह्यूमुळे २३ चेंडूत ४ चौकारांच्या मदतीने २४ धावा करत मलान पव्हेलियनला परतला.

पंतपुर्वी माजी यष्टीरक्षक धोनीनेही बऱ्याचदा अचूक रिव्ह्यू घेतल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे अनेकांना पंतमध्ये धोनीची झलक पाहायला मिळाली. सोशल मीडियावर पंतच्या या कामगिरीचे भरभरून कौतुक होत आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

INDvsENG 2nd T20 Live : इंग्लंडचे भारताला १६५ धावांचे आव्हान, सुंदर आणि शार्दुलने घेतल्या प्रत्येकी २ विकेट्स

युवराजने सलग पाचवा षटकार न मारण्यामागे होते ‘हे’ कारण; स्वत:च केला खुलासा

‘भूवी’ के वार से बचना नामुमकीन! विकेट वाचवण्याचा बटलरचा प्रयत्न व्यर्थ, ‘असा’ झाला शून्यावर पायचित

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---