---Advertisement---

‘व्वा शिखी भाई, ऐसा रोका की कॅमेरा में भी नहीं दिख रखा’; पंतची मजेशीर बडबड स्टंप माईकमध्ये कैद

On: गुरूवार, जानेवारी 20, 2022 1:08 AM
Rishabh Pant
---Advertisement---

भारतीय संघाचा युवा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत (Rishabh Pant) यापूर्वी अनेकदा मैदानावर मजा-मस्करी करताना दिसला आहे. सामन्यादरम्यान स्टंपच्या मागे यष्टीक्षणासाठी थांबलेल्या रिषभला त्याच्या मजेशीर अंदाज आणि वक्तव्यांसाठी ओळखले जाते. त्याला नेहमीच फलंदाजांना चिडवताना, यष्टीपाठी बडबड करताना तसेच गोलंदाजांना प्रोत्साहन देताना पाहिले गेले आहे. दक्षिण अफ्रिका आणि भारत यांच्यात बुधवारी (१९ जानेवारी) पार पडलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात देखील पंत त्याच्या गमतीशीर वक्तव्यासाठी चर्चेचा विषय ठरला.

भारतीय संघ सध्या दक्षिण अफ्रिका दौऱ्यावर आहे. कसोटी मालिकेत पराभव मिळाल्यानंतर दक्षिण अफ्रिकेविरुद्धची तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका बुधवारी सुरू झाली. सामन्यादरम्यान शिखर धवनने एक चौकार वाचवण्यासाठी केलेल्या उत्कृष्ट क्षेत्ररक्षणसाठी रिषभने त्याचे कौतुक केले. यावेळी त्याच्या तोंडचे शब्द स्टंप माइकमध्ये कैद झाले. यानंतर सोशल मीडियावर रिषभ पंतची सर्वत्र चर्चा होत आहे.

अनुभवी फलंदाज शिखर धवनने या सामन्यातून भारतीय संघात पुनरागमन केले. भारताच्या क्षेत्ररक्षणादरम्यान एक चेंडू सीमारेषेबाहेर चौकार चालला होता, पण धवनने मोठी झेप मारून तो अडवण्याचा प्रयत्न केला. पंचांना हा चेंडू चौकार आहे की नाही, ही गोष्ट समजत नव्हते. त्यामुळे पंचानी तिसऱ्या पंचाकडे रिव्हू मागितला. परंतु रिव्हूमध्ये देखील चित्र स्पष्टपणे दिसत नव्हते. रिव्हू पाहिला जात असताना रिषभ पंतच्या तोंडचे शब्द स्टंप माइकमध्ये कैद झाले.

यावर पंत म्हणाला की, “असा आडवला आहे की, कॅमेरॉमध्ये देखील दिसत नाहीय.” पंतच्या हे मजेशीर वक्तव्य चाहत्यांना मात्र खूपच आवडले आहे. पुढे बोलताना शिखर धवनने चौकार वाचवण्यासाठी केलेल्या प्रयत्नाचे त्याने कौतुक केले. “शिखर पा तुम्ही रागात उत्तम क्षेत्ररक्षण दाखवता. तुम्ही चेंडू असा आडवला आहे की, कॅमेरा हू देखील करत नाहीय,” असे पंत पुढे बोलताना म्हणाला. दरम्यान, पंतच्या हा मजेशीर अंदाज पाहून चाहते उत्सुक झाले आहेत आणि सोशल मीडियावर व्यक्त होत आहेत.

https://twitter.com/Muja_q_Nikala/status/1483756094082138112?s=20

https://twitter.com/anshztwitz/status/1483755471701958658?s=20

सामन्याचा विचार केला, तर दक्षिण अफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना दक्षिण अफ्रिकेने ४ विकेट्सच्या नुकसानावर २९६ धावा केल्या. दक्षिण अफ्रिकेसाठी टेंबा बावूमा (११०) आणि रासी वॅन डर ड्यूसेन (१२९) यांनी शतकी खेळी केली. तर भारतासाठी शिखर धवनने ७१  आणि कर्णधार विराट कोहलीने ५१ धावा केल्या.

महत्वाच्या बातम्या –

हरियाणा स्टिलर्सची पुणेरी पलटणला करारी शिकस्त, धाकधूकीच्या सामन्यात ७ गुणांनी मारली बाजी

काय सांगता! विराट पहिल्यांदाच खेळला वयाने लहान कर्णधाराच्या नेतृत्त्वाखाली, पाहा चकीत करणारी आकडेवारी

कसोटी मालिका गमावूनही कोहली, बुमराहची आयसीसी क्रमवारीत ‘उंच उडी’, रोहितही टॉप-१० मध्ये

व्हिडिओ पाहा –

सचिन-कांबळीच्या करामतीने गांगुलीच्या रुममध्ये झालेलं पाणीच पाणी| Sachin-Kambli Prank on Ganguly

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---