भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत हा मागील वर्षीच्या अखेरीस कार अपघातात गंभीर जखमी झाला होता. त्यामुळे त्याला क्रिकेटपासून दूर राहावे लागत आहे. 25 वर्षीय रिषभ पंत हा आवश्यक औषधोपचार करून बरा होत आहे. आता त्याच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. अनेक दिवसांपासून काठीवर चालत असलेला रिषभ आता विनाकाठीचा चालताना दिसला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
रिषभ पंत या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये डॉक्टरांसह दिसत आहे. यामध्ये तो सुरुवातीला काठीवर चालत पुढे येतो. त्यानंतर ती काठी फेकत तो अतिशय लयबद्ध पद्धतीने चालताना दिसतोय. रिषभला अशा पद्धतीने पाहून अनेकांनी तो लवकर बरा व्हावा यासाठी प्रार्थना केली आहे. असे असले तरी रिषभ थेट पुढील वर्षीच खेळू शकतो असे तज्ञांनी म्हटलेले.
Rishabh Pant walking without the walking stick.
The world cannot wait to see Pant back! pic.twitter.com/BVRvOHvGxb
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) May 5, 2023
मागील वर्षी डिसेंबरच्या अखेरीस रुडकी येथे जाताना रिषभ पंत कार अपघातात गंभीर जखमी झाला होता. तेव्हापासून तो उपचार घेत आहे. तसेच, तो क्रिकेटपासूनही दूर आहे. त्याच्या तब्येतीमध्ये हळूहळू सुधारणा होत असून, आगामी विश्वचषकापर्यंत तो तंदुरुस्त होण्याची शक्यता आहे. आयपीएलच्या काही सामन्यांमध्ये तो दिल्लीच्या डग आऊटमध्ये दिसू शकतो असे सुतवाच दिल्ली संघ व्यवस्थापनाकडून करण्यात आले होते. त्यानंतर रिषभने एका सामन्याला हजेरी लावत संघाचे मनोबल वाढवले होते.
आयपीएलच्या या हंगामासाठी दिल्ली कॅपिटल्सने कर्णधार म्हणून डेव्हिड वॉर्नर तर उपकर्णधार म्हणून अक्षर पटेल यांच्यावर जबाबदारी दिली गेलीये. त्याचबरोबर रिषभचा बदली खेळाडू म्हणून बंगालच्या अभिषेक पोरेल याचा दिल्ली संघात समावेश केला गेलाय.
(Rishabh Pant Walking Without Stick Video Goes Viral)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
रवी शास्त्रींनी व्यक्त केली आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या भविष्याबाबत चिंता, म्हणाले, “फुटबॉलसारख्या लीग…”
विराटला ठोठावलेला 1.07 कोटींचा दंड, पण पठ्ठ्या एक रुपड्याही नाही देणार; RCB उचलणार खर्च! कारण वाचाच