भारत आणि इंग्लंड संघात नॉटिंगघम येथे ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना बुधवारपासून सुरु झाला आहे. या सामन्यात भारतीय संघाचा पहिला डाव २७८ धावांवर संपुष्टात आला. भारताकडून केएल राहुल (८४) आणि रविंद्र जडेजा (५६) यांनी अर्धशतकी खेळी केली. मात्र, भारताचे अन्य फलंदाज मोठी कामगिरी करण्यात अपयशी ठरले, यात रिषभ पंतचाही समावेश आहे.
पंतची आक्रमक सुरुवात
या सामन्यात पंतने आपल्या खेळीची आक्रमक सुरुवात केली होती. त्यामुळे पंत जोपर्यंत क्रीजवर होता, तोपर्यंत इंग्लंडचे खेळाडू अनेक वेळा दबावाखाली दिसून आले. पण नॉटिंगहॅममध्ये वारंवार पावसामुळे खेळ थांबवण्यात आला ज्यामुळे पंत विचलित झाला आणि शेवटी त्याची विकेट पडली.
रिषभ पंतला २० चेंडूत २५ धावांची खेळी करता आली. या खेळीत पंतने ३ चौकार आणि १ षटकार ठोकला. त्याने ही खेळी १२५ च्या स्ट्राईक रेटने केली.
रिषभ पंत दुसऱ्या दिवशी मैदानात फलंदाजीसाठी उतपला होता. त्याने त्यावेळी सुरुवातीलाच जेम्स अँडरसनच्या गोलंदाजीवर चेंडू हवेत षटकार मारत धावांचे खाते उघडले होते. पण त्याच्या खेळीला सुरुवात झाल्यानंतर दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला. तिसऱ्या दिवशीही पंतने त्याचा आक्रमक अंदाज कायम ठेवला होता.
असा झाला पंत बाद
पंतने ५० व्या षटकात गोलंदाजी करणाऱ्या ऑली रॉबिन्सनच्या चेंडूवरही आक्रमक पवित्रा घेतला होता. रिषभ पंतने रॉबिन्सनच्या चौथ्या चेंडूवर जोरदार चौकार मारला आणि नंतर फाइन लेगकडे षटकार मारला. परंतु, पंत पुढच्याच चेंडूवर बाद देखील झाला.
ऑली रॉबिन्सनने ५० व्या षटकातील टाकलेल्या अखेरच्या चेंडूवर पंतने बचावात्मक खेळण्याचा प्रयत्न केला. पण चेंडू खेळपट्टीवर थोडा अडकला आणि थोडा जास्त उसळून आला. पंतला चेंडू जमिनीवर ठेवता आला नाही आणि शॉर्ट कव्हर साईडमध्ये उभा असलेला जॉनी बेअरस्टोच्या हातात झेल गेला. त्यामुळे पंतला विकेट गमवावी लागली.
Our first wicket of Day 3 – and it's a big one! 🙌
Scorecard/Videos: https://t.co/5eQO5BWXUp#ENGvIND pic.twitter.com/P89flN8csO
— England Cricket (@englandcricket) August 6, 2021
रिषभ पंतने २०२१ मध्ये भारतासाठी आत्तापर्यंत सर्वाधिक कसोटी धावा केल्या आहेत. पंतने १३ डावांमध्ये ५७६ धावा केल्या आहेत. त्याचबरोबर रोहित शर्माने १४ डावांमध्ये ५७४ धावा केल्या आहेत. चेतेश्वर पुजाराने १३ डावांमध्ये ३६८ धावा केल्या आहेत. शुभमन गिलने ३३४ आणि अजिंक्य रहाणेने २६८ धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
मोहम्मद सिराजने चेंडू चमकवण्यासाठी केले ‘असे’ कृत्य; व्हिडिओ होतोय व्हायरल
माजी निवडकर्त्याकडून डिव्हिलियर्सवर वर्णभेद केल्याचे गंभीर आरोप; मिस्टर ३६०ने दिले ‘असे’ उत्तर