दक्षिण आफ्रिकेचा संघ सध्या भारत दौऱ्यावर असून उभय संघात ५ सामन्यांची टी२० मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेतील पहिला सामना गुरुवारी (०९ जून) दिल्लीच्या फिरोजशहा कोटला स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या सामन्यापूर्वी भारतीय संघाला अनपेक्षित धक्के बसल्याने संघात काही मोठे बदल करण्यात आले आहेत. प्रभारी कर्णधार केएल राहुल दुखापतीमुळे टी२० मालिकेतून बाहेर पडल्याने त्याच्याजागी यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत याला नेतृत्त्वपद देण्यात आले आहे.
पंत (Rishabh Pant) टी२० क्रिकेटमध्ये भारतीय संघाचे नेतृत्त्व करणारा आठवा खेळाडू (8th Indian T20I Captain) असेल. पंतला इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलमध्ये आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये दिल्ली संघाचे नेतृत्त्व करण्याचा अनुभव आहे. तो यापूर्वी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी२० मालिकेसाठी भारतीय संघाचा उपकर्णधार होता. परंतु आता राहुलच्या अनुपस्थित त्याच्यावर कर्णधारपदाचा भार सोपवण्यात आला आहे. अशात हार्दिक पंड्याकडे संघाचे उपकर्णधारपद आले आहे.
पंतपूर्वी ७ वेगवेगळ्या खेळाडूंनी टी२० क्रिकेटमध्ये भारतीय संघाचे नेतृत्त्व केले आहे. टी२० क्रिकेटमध्ये भारतीय संघाला मिळालेला पहिलीवहिला कर्णधार होता, माजी विस्फोटक फलंदाज विरेंद्र सेहवाग. सेहवागने २००६ मध्ये भारताच्या टी२० संघाची धुरा हाती घेतली होती. त्याने तो एकमेव सामना कर्णधार म्हणून खेळल्यानंतर त्याला पुन्हा ही संधी मिळाली नाही. त्यानंतर एमएस धोनीकडे टी२० संघाचे नेतृत्त्वपद आले. त्याने संघाला पहिला टी२० विश्वचषकही जिंकून दिला. धोनीने सर्वाधिक ७२ टी२० सामन्यांमध्ये संघाचे नेतृत्त्व केले होते.
धोनीव्यतिरिक्त अजिंक्य रहाणे (०२ सामने), विराट कोहली (५० सामने), रोहित शर्मा (२८ सामने) आणि शिखर धवन (०३ सामने) यांनीही भारताच्या टी२० संघाती कमान सांभाळली आहे.
भारताकडून टी२० क्रिकेट खेळलेल्या कर्णधारांची यादी
१. विरेंद्र सेहवाग (१ सामना)
२. एमएस धोनी (७२ सामने)
३. सुरेश रैना (३ सामने)
४. अजिंक्य रहाणे (२सामने)
५. विराट कोहली (५० सामने)
६. रोहित शर्मा (२८ सामने)
७. शिखर धवन (3 सामने)
८. रिषभ पंत (९ जून २०२२ रोजी पहिला सामना)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
INDvsSA। पहिल्या सामन्यासाठी रिषभ पंत देऊ शकतो ‘या’ खेळाडूंना संधी
धडाकेबाज क्रिकेटपटू असूनही ‘दारूडा’ म्हणून ओळखला जाणारा एँड्र्यू सायमंड्स
हॅरिस राउफचा विकेट्सचा चौकार, बाबर आझमचे शतक; पहिल्या वनडेत पाकिस्तानचा ५ विकेट्सने विजय