---Advertisement---

Asia Cup: पाकिस्तानविरुद्ध भारताला घ्यावा लागणार मोठा निर्णय, दिनेश कार्तिकला बसावे लागेल बाहेर!

On: रविवार, सप्टेंबर 4, 2022 4:30 PM
Dinesh-Karthik-Rahul-Dravid
---Advertisement---

एकाच महिन्यात दुसऱ्यांदा भारत विरुद्ध पाकिस्तान समोरासमोर येत आहे. आशिया चषक (Asia Cup) 2022च्या हंगामात रविवारी (4 सप्टेंबर) हे दोन संघ दुबईच्या मैदानावर भिडणार आहेत. सुपर फोरच्या या सामन्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. तर मागील रविवारी (28 ऑगस्ट) झालेल्या पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात रिषभ पंत खेळला नाही. मात्र आता संघव्यवस्थापकांसमोर पुन्हा एकदा या दिनेश कार्तिक की पंत हा प्रश्न निर्माण झाला आहे.

रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) हा दुखापतीमुळे या स्पर्धेबाहेर झाला आहे. त्याने आशिया चषकाच्या 15व्या हंगामातील पाकिस्तान विरुद्धच्या साखळी सामन्यात चौथ्या क्रमांकावर फलंदाजी केली होती, कारण भारताकडून सहाव्या क्रमांकापर्यंत एकही डाव्या हाताचा फलंदाज उपलब्ध नव्हता. तर त्याच सामन्यात विराट कोहली तिसऱ्या, सूर्यकुमार यादव चौथ्या, हार्दिक पंड्या (Hardik Pandya) पाचव्या आणि दिनेश कार्तिक सहाव्या स्थानावर फलंदाजी करणार होते. मात्र सामन्याची स्थिती पाहता जडेजाला चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यास पाठवले गेले.

जडेजा दुखापतग्रस्त असल्याने पुन्हा एकदा डाव्या हाताच्या फलंदाजाची कमतरता जाणवली आहे. अशातच मधल्या फळीत कोणता डाव्या हाताचा खेळाडू फलंदाजी करेल हा प्रश्न निर्माण झाला आहे. संघामध्ये अक्षर पटेल (Axar Patel) याचे पुनरागमन झाले आहे, मात्र तो चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करू शकत नाही. अशा परिस्थितीत भारताच्या संघव्यवस्थापकांकडे रिषभ पंत हाच एक पर्याय आहे. तर त्यासाठी पंत की कार्तिक याबाबत योग्य निर्णय घ्यावा लागेल.

जडेजाच्या जागी पटेल योग्य आहे, मात्र समजा विकेटकिपर पंत असेल कारण त्याचावर आणि पंड्यावर फिनिशरची जबाबदारी असणार आहे. जर पंतला चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यास पाठवले जाते तर तो सहाव्या क्रमांकावर देखील फलंदाजी करू शकतो. तर पंड्या हा पाचव्या क्रमांकासाठी योग्य फलंदाज आहे. त्याने याच क्रमांकावर उत्तम खेळी केल्या आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---