भारताचा युवा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतला परिपक्व होण्यास वेळ लागेल, असा विश्वास इंग्लंडचा माजी कर्णधार केविन पीटरसनने व्यक्त केला आहे. त्याने असेही म्हटले आहे की त्याला त्याच्या पूर्ण क्षमतेनुसार योग्य प्रदर्शन करण्यास अद्याप काही वेळ आहे.
गेल्या काही काळापासून खराब फॉर्ममधून जात असलेल्या पंतला मागील अनेक दिवसांपासून टीकेचा सामना करावा लागत आहे. फलंदाजी आणि यष्टीरक्षणातील अपयशाव्यतिरिक्त त्याचे काही डीआरएसचे निर्णयही चूकीचे ठरले आहेत. त्यामुळेच त्याला टीकेला सामोरे जावे लागत आहे.
पीटरसन स्टार स्पोर्ट्सवरील एका शो मध्ये म्हणाला, ” रिषभ पंत युवा खेळाडू आहे आणि त्याच्यात ऊर्जा आणि उत्साह आहे. तो आयपीएल खेळतो आणि भारताकडूनही खेळत आहे. तो त्याचे स्वप्न जगत आहे. त्याच्या अवतीभवती अनेक टिकाकार आहेत. तो फक्त 21-22 वर्षांचा आहे.”
पीटरसन पुढे म्हणाला, ‘मी आयपीएलमध्ये त्याला अगदी जवळून पाहिले आहे आणि तो पुन्हा त्याच त्याच चुका करतो. जर तुम्ही असे केले तर खेळ खेळलेले टीका करतील कारण तुम्ही चुकांपासून शिकले पाहिजे.’
“तो 21 वर्षांचा असल्याचे मला कधीच वाटले नाही. मला वाटले की तो 24 किंवा 25 वर्षांचा आहे. कारण त्या वयात तुम्ही तूमच्या खेळात परिपक्व होता आणि 27 ते 30 वयात सर्वोत्कृष्ट क्रिकेट खेळता.’
गेल्या आठवड्यात भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीनेही पंतला पाठिंबा दिला होता. तसेच म्हटले होते की पंतला एकटे सोडून चालणार नाही.
याबद्दल पीटरसन म्हणाला, “जर आपण त्याच्या चुका आणि तो ज्या स्थितीत आहे त्याचा विचार केला तर संघ आणि विराट त्याच्या पाठिशी आहेत आणि एमएस धोनी सध्या संघाबाहेर आहे, त्यामुळे त्याला त्याच्याकडे अजून बराच मोठा टप्पा गाठायचा आहे.”
त्याच्याकडे अजून वेळ आहे आणि भविष्यात तो भारतीय क्रिकेटचा सुपरस्टार बनेल. त्याला परिपक्व होण्यासाठी वेळ द्यावा लागेल, असेही पीटरसन म्हणाला.
104 कसोटी सामने खेळलेला पीटरसन पुढे म्हणाला, ‘रिषभ पंत जेव्हा आला तेव्हा त्याने खूप उत्सुकता निर्माण केली होती. त्याच्याकडे आक्रमकता आहे. भारतीय चाहत्यांची अशी अपेक्षा होती की कोणीतरी त्वरित धोनीची जागा घ्यावी पण तो पूर्णपणे वेगळा खेळाडू आहे.’
मला माहित आहे की 8-9 महिन्यांनी टी20 विश्वचषक आहे, त्यामुळे आत्ताचा वेळ खूप महत्त्वाचा आहे आणि ते दुसऱ्या यष्टीरक्षकाचा विचारही करु शकतात. पण पंतवर अतिरिक्त दबाव टाकणे योग्य नाही.’
टीम इंडिच्या खराब फिल्डिंगवर भडकला कर्णधार कोहली; म्हणाला…
वाचा????https://t.co/sVAab63hn9????#म #मराठी #INDvsWI #Cricket @Mazi_Marathi @MarathiRT #TeamIndia #ViratKohli— Maha Sports (@Maha_Sports) December 9, 2019
या विंडीजच्या खेळाडूने ४ वर्षीय चिमुकलीला दिली खास भेट; जिंकले भारतीय चाहत्यांचे मन
वाचा????https://t.co/hf4iVTcjHw????#म #मराठी #INDvsWI #Cricket @Mazi_Marathi @MarathiRT— Maha Sports (@Maha_Sports) December 9, 2019





