आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीला 19 फेब्रुवारीपासून सुरूवात होणार आहे. त्याआधी, माजी भारतीय वेगवान गोलंदाज झहीर खानने या वर्षीच्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारतीय संघासाठी एक्स-फॅक्टर ठरू शकणाऱ्या खेळाडूचे नाव सांगितले आहे. क्रिकबझशी बोलताना झहीरने या संदर्भात वक्तव्य केले आहे. झहीर म्हणाला, चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये रिषभ पंतशिवाय दुसरा कोणीही भारतीय संघासाठी एक्स-फॅक्टर ठरू शकत नाही. असे माजी भारतीय वेगवान गोलंदाजाने मान्य केले आहे.
झहीर खानने क्रिकबझशी बोलताना पंतबद्दल आपले मत मांडले आणि म्हणाला, “मी दिल्ली कॅपिटल्समध्ये असताना पहिल्यांदा त्याच्यासोबत काम केले होते. तो अंडर19 विश्वचषकातून परतला होता. नेहमीच तो त्याच्या खेळावर ठाम होता. तो 19 वर्षांखालील विश्वचषकातून परतला. त्याचा त्याच्या खेळाकडे नेहमीच निर्भय दृष्टिकोन होता”. झहीरने पंतच्या भारताचा कर्णधार होण्याच्या क्षमतेबद्दल आपले मत व्यक्त केले आणि तो म्हणाला, “तो एक लीडर आहे आणि मला खात्री आहे की तो भविष्यात भारताचे नेतृत्व करू शकेल. आयपीएल दरम्यान पंत कर्णधारपदाबद्दल शिकेल आणि आम्ही त्याला मदत करू”
झहीरने त्याची तुलना भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागशी केली आणि म्हणाला, “तो वीरेंद्र सेहवागसारखा आहे. त्याची फलंदाजीची शैली वीरूसारखीच आहे आणि त्याच्याप्रमाणेच त्यालाही मैदानावर मोकळेपणाने खेळण्याची गरज आहे. आयपीएल लीगमध्ये तो येत्या हंगामात आपल्यासाठी चांगली कामगिरी करण्याची शक्यता आहे.” आयपीएल लिलावात पंतला लखनऊ सुपरजायंट्सने 27 कोटी रुपयांना खरेदी केले आणि त्यांच्या संघात समाविष्ट केले. पंतला लखनऊचा नवा कर्णधारही बनवण्यात आले आहे.
हेही वाचा-
38 वर्षाय खेळाडूनं रचला पकिस्तान क्रिकेटमध्ये नवा इतिहास, अशी कमागिरी करणारा प्रथमच!
सूर्यकुमार यादव सिक्सर किंग रोहित शर्माच्या खास क्लबमध्ये प्रवेश करणार? करावा लागेल हा पराक्रम
‘देशांतर्गत स्पर्धा आयपीएलच्या बरोबरीची…’, वरुण चक्रवर्तीने त्याच्या यशाचे रहस्य उलगडले