भारत विरुद्ध श्रीलंका (IND vs SL) यांच्यातील २ सामन्यांची कसोटी मालिका (2 Test Match Series) नुकतीच पार पडली असून भारताने या मालिकेत श्रीलंकेला २-० ने क्लिन स्वीप केले आहे. या मालिकेत सर्वोत्तम प्रदर्शन करणाऱ्या भारताचा यष्टीरक्षक रिषभ पंत (Rishabh Pant) याला मालिकावीर पुरस्कार (Man Of The Series Award) देऊन गौरविण्यात आले आहे. या संपूर्ण कसोटी मालिकेदरम्यान भारताकडून श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) आणि जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) यांनीही शानदार प्रदर्शन केले. तरीही पंतलाच मालिकावीर निवडले गेले. यामागचे कारण आपण या बातमीतून जाणून घेऊ…
या मालिकेदरम्यान श्रेयस अय्यरने २ सामन्यांमध्ये ६२ च्या सरासरीने फलंदाजी करताना १८६ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याची सर्वोच्च वैयक्तिक खेळी ९२ धावा राहिली आहे. तर वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहनेही संपूर्ण मालिकेदरम्यान १० विकेट्स घेतल्या आहेत. यात त्याच्या दुसऱ्या कसोटी सामन्यातील बळींच्या पंचकांचाही समावेश आहे.
तर रिषभ पंतची कामगिरी पाहायची झाल्यास, त्याने या मालिकेत ६१ च्या सरासरीने १८५ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याची सर्वोच्च वैयक्तिक खेळी ९६ धावा राहिली आहे.
पंतला मालिकावीर निवडण्यामागचे कारण
थोडक्यात सांगायचे झाल्यास, बुमराह, अय्यर आणि पंत या तिघांची कसोटी मालिकेतील कामगिरी जवळजवळ सारखीच राहिली आहे. तरीही यांपैकी पंतला मालिकावीर निवडले गेले. कारण त्याचा या संपूर्ण मालिकेतील प्रभाव (Impact Man) अय्यर आणि बुमराहपेक्षा जास्त राहिला आहे. त्याने कसोटी सामन्यांमध्येही इतर खेळाडूंप्रमाणे बचावात्मक फलंदाजी न करता आपल्या विस्फोटक शैलीचा नमुना पेश केला आणि सर्वांचे लक्ष वेधले आहे. याच कारणामुळे अय्यर आणि बुमराह ऐवजी त्याला मालिकावीर निवडले गेले.
रिषभ पंतने रचला इतिहास
पंतने श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत मालिकावीर बनत इतिहास रचला आहे. तो कसोटी मालिकेत मालिकावीर पुरस्कार जिंकणारा पहिलाच भारतीय यष्टीरक्षक बनला आहे. त्याच्यापूर्वी भारताकडून एमएस धोनी, वृद्धिमान साहा, किरण मोरे, सय्यद किरमानी असे बरेच यष्टीरक्षक खेळले आहेत. परंतु त्यांना कधीही कसोटी मालिकेत मालिकावीर बनता आले नव्हते.
महत्त्वाच्या बातम्या-
कसोटी क्रिकेट @१४५! इंग्लंडने खेळले हजारहून अधिक सामने, तर ‘अशी’ राहिली भारताची कामगिरी
ना धोनी, ना कोणी; केवळ ‘यष्टीरक्षक’ रिषभ पंतने कसोटी क्रिकेटमध्ये साधलाय ‘तो’ पराक्रम