भारताचा स्टार विकेटकीपर-फलंदाज रिषभ पंत याच्या कारला मोठा अपघात झाला आहे. दिल्ली-डेहराडून महामार्गावर झालेल्या कार अपघातातून तो बचावला आहे. त्याच्या डोक्याला, पाठीला आणि पायाला गंभीर दुखापत झाली असून त्याला त्वरीत हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले आहे. या घटनेत त्याची गाडी संपूर्णपणे जळाली यावरूनच हा अपघात किती गंभीर होता हे लक्षात येते.
रिषभ पंत (Rishabh Pant) याचा अपघात उत्तराखंडमधील रुरकी या त्याच्या गावी जात असताना झाला. शुक्रवारी (30 डिसेंबर) पहाटे तो हा अपघात झाल्याचे समजते. त्यानंतर त्याला डेहराडूनच्या स्थानिक रुग्णालयात नेण्यात आले असून पुढे त्याला दिल्लीतील खासगी मल्टी स्पेशालिटी रुग्णालयात हलवण्यात येणार आहे.
पंतवर प्लास्टिक सर्जरी करण्यात येणार आहे. डॉक्टरांच्या रिपोर्टनुसार, त्याच्या डोक्याला आणि पायाला दुखापत झाली आहे. घटनास्थळी पोलिस पोहोचले असून अधिक तपास सुरू आहे.
रेलिंगला धडकली पंतची कार
तेथे उपस्थित असलेल्या लोकांनी पंतची कार रेलिंगला धडकल्याचे पाहिले. ज्यानंतर कारला आग लागली. ती अनेक प्रयत्नानंतर विझवण्यात यश आले.
Thank God you saved our @RishabhPant17 make him strong so that he will back soon to action, wish you speedy recovery. Want to see you in test against #INDvsAUS pic.twitter.com/Ok1fVaYfRV
— Sudhira Nahak (@SudhiraNahak199) December 30, 2022
राष्ट्रीय क्रिकेट अकॅडमीचे (एनसीए) प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मण (VVS Laxman) यांनी ट्विटरवर ‘पंत धोक्याबाहेर आहे. तो लवकर बरा व्हावा हीच इच्छा’, असे सांगितले.
Praying for Rishabh Pant. Thankfully he is out of danger. Wishing @RishabhPant17 a very speedy recovery. Get well soon Champ.
— VVS Laxman (@VVSLaxman281) December 30, 2022
पंत श्रीलंकेविरुद्धच्या मालिकांमध्ये नाही
3 जानेवारीपासून भारत घरच्या मैदानावर श्रीलंकेविरुद्ध तीन सामन्यांची वनडे आणि तेवढ्याच सामन्यांची टी20 मालिका खेळणार आहे. या दोन्ही मालिकांमधून पंतला वगळले आहे. त्याला फिटनेसच्या कारणास्तव संघात जागी मिळाली नाही. यामुळे तो एमसीएकडे रवाना होत होता. फेब्रुवारीमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी फिट होण्यासाठी तो बंगळुरूला जाणार होता.
पंतने नुकतेच बांगलादेश दौऱ्यात सामनाविजयी खेळी केली होती. त्याने कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारताच्या पहिल्या डावात 93 धावा केल्या होत्या. हा सामना भारताने 3 विकेट्सने जिंकत मालिका 2-0 अशी खिशात घातली होती. ज्यामुळे भारताच्या आयसीसी जागतिक कसोटी चॅम्पियनशीपच्या अंतिम फेरीत जाण्याच्या आशा आणखी मजबूत झाल्या.
पंतने मागील अनेक कसोटी सामन्यांमध्ये महत्वपूर्ण खेळी करत संघाच्या विजयात मोलाची भुमिका पार पाडली आहे. पुढील महिन्यात भारत घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध चार सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
दु:खद बातमी! फुटबॉल सम्राट पेलेंचे निधन, वयाच्या 82व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
“रिषभने यष्टीरक्षणाकडे लक्ष द्यावे”, दिग्गज यष्टीरक्षकानेच दिला सल्ला