रविवारी (०२ मे) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पंजाब किंग्ज विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात चुरसीची लढत झाली. आयपीएल २०२१ च्या या २९ व्या सामन्यात कर्णधार केएल राहुलच्या अनुपस्थित मयंक अगरवालने महत्त्वाची भूमिका पार पाडली. त्याच्या नाबाद ९९ धावांच्या खेळीच्या जोरावर पंजाबने दिल्लीने १६७ धावांचे आव्हान दिले. प्रत्युत्तरात शिखर धवनच्या अर्धशतकी खेळीने १७.४ षटकातच संघाला ७ विकेट्सने सामना जिंकून दिला.
दरम्यान दिल्लीचा कर्णधार रिषभ पंतसोबत मजेशीर प्रसंग घडला. या प्रसंगाने क्रिकेटरसिंकाना ‘रोहितच रोहितची विकेट घेऊ शकतो’, या कथित वाक्याची आठवण करुन दिली आहे.
त्याचे झाले असे की, पंजाबच्या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्ली संघ १३ व्या षटकापर्यंत २ बाद १११ धावा अशा स्थितीत होता. यावेळी पंत चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता. ११ चेंडूत १ चौकार आणि १ षटकार मारत त्याने १४ धावा केल्या होत्या. अशात सतराव्या षटकात ख्रिस जॉर्डन गोलंदाजीसाठी आला होता.
त्याच्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर पंतने ऑउटसाइड ऑफला मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. परंतु अचानक त्याच्या हातून बॅट सुटली. त्यामुळे चेंडू जास्त दूर जाऊ शकला नाही आणि मयंक अगरवालने सहज त्याचा झेल पकडला. अशाप्रकारे पंत दुर्दैवाने स्वतच्याच हातून बाद झाला.
यानंतर क्रिकेट चाहत्यांनी ‘रोहितच रोहितची विकेट घेऊ शकतो’, हे प्रसिद्ध वाक्य बदलून ‘पंतच पंतची विकेट घेऊ शकतो’, असे म्हटले आहे. अनेकांच्या यावर वेगवेगळ्या प्रतिक्रियाही उमटत आहेत.
https://twitter.com/lodulalit001/status/1388913830617444356?s=20
पंत बाद झाल्यानंतर शिमरॉन हेटमायरने ४ चेंडूत नाबाद १६ धावा करत संघाला विजय मिळवून दिला. त्याने ४०० च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करताना २ षटकार आणि १ चौकार मारत ही धावसंख्या केली.
महत्त्वाच्या बातम्या-
व्हिडिओ : सनरायझर्स हैद्राबादची गचाळ फिल्डिंग! बटलर आणि सॅमसनचे सोडले सोपे झेल
गोंधळच गोंधळ! विकेट वाचवण्याच्या नादात दोन्ही फलंदाज धावले एकाच एंडला, पाहा व्हिडिओ