---Advertisement---

ऋषभ पंतचं प्रमोशन, अय्यर-किशनचं पुनरागमन BCCIच्या नव्या सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमधील बदल जाणून घ्या

---Advertisement---

भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाने 2024-25 हंगामासाठी सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट यादी जाहीर केली आहे. विराट कोहली, रोहित शर्मा सहित काही अनुभवी खेळाडूंच्या श्रेणीत बदल झालेला नाही. श्रेयस अय्यरला त्याच्या शानदार खेळासाठी बक्षीस मिळाले आहे. तसेच काही खेळाडूंचे बीसीसीआयने प्रमोशन केले आहे. यादरम्यान काही खेळाडूंना कॉन्ट्रॅक्ट मधून वगळण्यात आले आहे, जाणून घ्या की कोणते कोणते बदल झाले आहेत.

श्रेयस अय्यर आणि ईशान किशन यांचं नाव 2024 मध्ये खूप चर्चेत राहिलं आहे. त्यांना रणजी ट्रॉफीमध्ये खेळणं एवढं महागात पडलं की, बीसीसीआयने दोघांना सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट यादी मधून बाहेर केले होते. 2025 मध्ये भारतीय संघासाठी 243 धावा करून श्रेयस अय्यरला ब श्रेणीमध्ये स्थान देण्यात आले आहे. आता त्याला वर्षाला तीन करोड रुपये पगार मिळेल, तसेच ईशान किशन क श्रेणीमध्ये आहे त्याला वर्षाला एक करोड रुपये मिळतील.

ऋषभ पंत हळूहळू भारताच्या अनुभवी खेळाडूंमध्ये स्थान निर्माण करत आहे. 2023- 24 हंगामाच्या यादीत रिषभ पंतला ब श्रेणीमध्ये स्थान देण्यात आले होते, पण आता बीसीसीआयने त्याचे प्रमोशन करत त्याला अ श्रेणीमध्ये स्थान दिले आहे. त्याला आता वर्षाला 5 करोड रुपये मिळतील.

बीसीसीआयने हर्षित राणा, अभिषेक शर्मा, नितीश कुमार रेड्डी आणि वरूण चक्रवर्ती सहित 8 खेळाडूंना सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमध्ये सामील केले आहे, पण शार्दुल ठाकूर, जितेश शर्मा, केएस भरत आणि आवेश खान यांना सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट यादीतून बाहेर करण्यात आले आहे. मागच्या हंगामात हे 4 खेळाडू क श्रेणीमध्ये सामील होते.

‘अ’ प्लस श्रेणी- रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा.

‘अ’ श्रेणी – मोहम्मद सिराज, केएल राहुल, शुबमन गिल, हार्दिक पांड्या, मोहम्मद शमी, ऋषभ पंत.

‘ब’ श्रेणी- सूर्यकुमार यादव, कुलदीप यादव, अक्षर पटेल, यशस्वी जायसवाल आणि श्रेयस अय्यर.

‘क’ श्रेणी- रिंकू सिंग, तिलक वर्मा, ऋतुराज गायकवाड़, शिवम दुबे, रवि बिश्नोई, वॉशिंग्टन सुंदर, मुकेश कुमार, संजू सॅमसन, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा, रजत पाटीदार, ध्रुव जुरेल, सरफ़राज़ खान, नितीश कुमार रेड्डी, ईशान किशन, अभिषेक शर्मा, आकाश दीप, वरुण चक्रवर्ती, हर्षित राणा.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---