---Advertisement---

रिषभ पंतची बहीण साक्षीची नव्या इनिंगला सुरूवात; बाॅयफ्रेंड अंकित चौधरीसोबत केली एंगेजमेंट, पाहा फोटो

On: रविवार, जानेवारी 7, 2024 1:08 PM
Rishabh-Pant-Sister-Engagement
---Advertisement---

Rishabh Pant Sister Engagement: भारताचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत याची बहीण साक्षी पंत हीने तिचा प्रियकर अंकित चौधरीसोबत एंगेजमेंट केली आहे. साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ऋषभ पंतची बहीण साक्षी पंतनेही तिच्या इंस्टाग्रामवर अंकितसोबतच्या लग्नाचा फोटो पोस्ट केला आहे. पंत अलीकडेच एमएस धोनी याच्यासोबत दुबईत दिसला होता, जिथे त्यांनी एकत्र नवीन वर्ष साजरे केले होते. पण पंत आता भारतात परतला आहे आणि त्याच्या बहिणीच्या साखरपुड्याला उपस्थित होता.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, रिषभ पंत याची बहीण साक्षी पंत तिचा बॉयफ्रेंड अंकित चौधरीला जवळपास नऊ वर्षांपासून डेट करत होती. रिषभने इंस्टाग्रामवर एंगेजमेंटचे फोटो शेअर केले आणि लिहिले, “अभिनंदन बहिणा.” रिषभच्या या पोस्टवर अनेक क्रिकेटपटूंनी कमेंट करून त्यांचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या आहेत. एंगेजमेंट दरम्यान रिषभ त्याच्या मित्र आणि बहिणीसोबत दिसला.

यावेळी पंतने काळ्या रंगाचे कपडे घातलेले दिसले. त्याची आई त्याच्यासोबत हेवी बेज रंगाच्या साडीत दिसली. तसेच, बहीण सोनेरी रंगाच्या लेहेंग्यात तर अंकित पिंक रंगाचा कुर्ता पायजमा घातलेला दिसला. फोटोमध्ये पंत खूप आनंदी दिसत आहे. रिषभ पंत व्यतिरिक्त, त्याची बहीण साक्षीने तिच्या इंस्टाग्रामवर अंकित चौधरीसोबतचे लग्नाचे काही फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये ती आणि अंकित खूप खुश दिसत आहेत. साक्षीने एंगेजमेंट फोटोसोबत कॅप्शनमध्ये लिहिले की, “आमच्या प्रेमकथेचा नवीन अध्याय.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Rishabh Pant (@rishabpant)

रिषभ पंतचा डिसेंबर 2022 मध्ये एका भीषण कार अपघात झाला होता. 30 डिसेंबर 2022 रोजी तो दिल्लीहून त्याच्या मूळ गावी रुरकीला त्याच्या मर्सिडीज कारने जात असताना वाटेत त्याची कार दुभाजकाला धडकली होती. अपघातानंतर त्याची कार जळून खाक झाली, मात्र तो कसा तरी स्वतःला वाचवण्यात यशस्वी झाला. यातून आता तो झपाट्याने बरा होत असून आयपीएल 2024 मध्ये खेळेल अशी अपेक्षा आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sakshi Pant (@sakshi.pant)

पंतने भारतीय संघासाठी आतापर्यंत 33 कसोटी, 30 एकदिवसीय आणि 60 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. 26 वर्षीय पंत अलीकडेच दुबई येथे आयोजित आयपीएल 2024 लिलावादरम्यान दिल्ली कॅपिटल्सचे क्रिकेट संचालक सौरव गांगुली यांच्यासह उपस्थित होता. अपघातामुळे पंत 2023 वर्षात एकदाही क्रिकेट खेळू शकला नाही. पण आता तो आयपीएल 2024 मध्ये पुनरागमन करण्यासाठी सज्ज असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Rishabh Pant’s sister Sakshi starts the new innings Engaged with boyfriend Ankit Chaudhary see photos)

हेही वाचा

Rashid Khan: टी20 संघात असूनही राशिद खान भारताविरुद्ध का खेळणार नाही?, मोठे कारण आले समोर, वाचाच
T20 World Cup: उफाळला नवा वाद; IND vs PAK सामन्याच्या पोस्टरमधून रोहित गायब, टी20 विश्वचषकात हार्दिक होणार कर्णधार?

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---