---Advertisement---

विराट कोहलीला मुलगी झाल्याचे कळताच रितेश देशमुख यांनी दिली ‘अशी’ प्रतिक्रिया, पाहा व्हिडिओ

On: बुधवार, जानेवारी 13, 2021 9:28 PM
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली व अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या घरी नुकत्याच छोट्या परीचे आगमन झाले आहे. विराट व अनुष्का यांना मुलगी झाली असून त्याबद्दल सर्व भारतवासीयांकडून त्यांना शुभेच्छा मिळत आहेत. अशातच महाराष्ट्राचे लाडके सुपरस्टार रितेश देशमुख यांनी देखील अनुष्का व विराट यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

एक कार्यक्रम संपवून रितेश गेटच्या बाहेर पडत असताना त्यांना पत्रकारांनी ही आनंदाची बातमी दिली. यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली की, “मला हे ऐकून निश्चितच आनंद झाला. विराट व अनुष्का यांना खूप खूप शुभेच्छा. तुमचे देखील आभार की तुम्ही मला ही आनंदाची बातमी दिली.”

व्हिडिओ –

https://www.instagram.com/p/CJ5zuDQnTfM/?hl=en

रितेश हे क्रिकेटचे फार मोठे फॅन आहेत हे सर्वश्रुत आहे. विशेषत: ते अजिंक्य रहाणे व विराटचे फार मोठे फॅन आहेत. भारतीय संघाच्या चांगल्या खेळाबद्दल नेहमीच त्यांनी संघाचे कौतुक केले आहे.

महत्वाच्या बातम्या:

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी : आंध्र प्रदेशवर 6 विकेट्सने मात करत दिल्लीचा सलग दुसरा विजय 

ब्रिस्बेन कसोटीसाठी भारताचे फिरकी अस्त्र तयार? कुलदीप यादवने केला कसून सराव, पाहा व्हिडिओ

वर्णद्वेषी टीकेप्रकरणी या ऑस्ट्रेलियन खेळाडूने केले सिराजाचे कौतुक, म्हणाला त्याने एक नवा आदर्श निर्माण केला आहे

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---