---Advertisement---

ब्रिस्बेन कसोटीसाठी भारताचे फिरकी अस्त्र तयार? कुलदीप यादवने केला कसून सराव, पाहा व्हिडिओ

On: बुधवार, जानेवारी 13, 2021 8:31 PM
---Advertisement---

भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर चार सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने विजय मिळविला होता तर दुसऱ्या सामन्यात भारताने पुनरागमन करत ऑस्ट्रेलियाला मत दिली होती. त्यानंन्तर सिडनी येथे झालेल्या तिसऱ्या सामन्यात भारताने पराभव वाचवत जिगरबाज खेळ करून सामना अनिर्णीत ठेवला. त्यामुळे मालिकेत आता १-१ अशी बरोबरी असून चौथ्या सामन्यासाठी दोन्ही संघ कसून तयारी करत आहेत.

भारतीय संघासमोर मात्र चौथ्या कसोटीसाठी दुखापतींचे आव्हान आहे. अनेक महत्वाचे खेळाडू दुखापतग्रस्त झाल्याने नवोदित खेळाडूंना या सामन्यात संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. अष्टपैलू रवींद्र जडेजा तर चौथ्या सामन्यात खेळणार नाही, हे निश्चित असल्याने त्याच्या जागी चायनामन फिरकी गोलंदाज कुलदीप यादवला संधी मिळण्याची शक्यता आहे. कुलदीप देखील या सामन्यासाठी जय्यत तयारी करत असल्याचे दिसून येत आहे.

बीसीसीआयने भारतीय संघाच्या सरावाचा एक व्हिडिओ आज शेअर केला. त्यात कुलदीप यादव आपल्या फिरकीचे अस्त्र आगामी कसोटीसाठी सज्ज करत असल्याचे दिसून आले. या व्हिडिओत नेट्समध्ये कुलदीप भारताचा युवा फलंदाज शुबमन गिलला गोलंदाजी करत असल्याचे दिसून येत आहे. कुलदीपने यावेळी राउंड द विकेट येऊन टाकलेला चेंडू शुबमनला कळला नाही, आणि तो थेट त्याच्या पायावर जाऊन आदळला. त्यामुळे अशाच प्रकारे ऑस्ट्रेलियन फलंदाजांनाही चकमा देण्यासाठी कुलदीप तयार असल्याचे दिसते आहे.

दरम्यान, या मालिकेतील चौथा सामना ब्रिस्बेनच्या मैदानावर खेळवला जाणार आहे. १५ जानेवारीपासून या सामन्याला सुरुवात होईल. भारतीय संघाचा ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील हा शेवटचा सामना असेल.

महत्वाच्या बातम्या:

धोनी सीएसकेची केवळ या हंगामासाठी संघबांधणी करेल

टीम पेनने सोडलेल्या झेलबद्दल कामरान अकमलची प्रतिक्रिया, मला आनंद वाटतो की

रिषभ पंतने ४ महिन्यात १० किलो वजन केले कमी; प्रशिक्षकांनी केला उलगडा  

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---