इंडियन प्रीमियर लीगमध्ये मुंबई इंडियन्सला सर्वात यशस्वी संघ बनवण्यात रोहित शर्मा याचा महत्वाचा राहिला आहे. रोहितच्याच नेतृत्वात मुंबई इंडियन्सने पाच आयपीएल ट्रॉफी जिंकल्या. पण आगामी आयपीएल हंगामात रोहित मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करणार नाहीये. हार्दिक पंड्या पुन्हा एकदा संघासोबत जोडला गेला आहे. हार्दिकला आगामी हंगामासाठी फ्रँचायझीने संघाचे कर्णधारपद देखील सोपवले आहे. याच पार्श्वभूमीवर आता पहिल्यांदाच रोहितची पत्नी रितिका सजदेह हिची प्रतिक्रिया समोर येत आहे.
आयपीएल 2024 पूर्वी डिसेंबर 2023 मध्ये खेळाडूंचा लिलाव पार पडला. मुंबई इंडियन्सलाने या लिलिवाआधी एक मोठी चाल चालली. आपला माजी खेळाडू हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याला फ्रँचायझीने 15 कोटी रुपयांमध्ये गुजरात टायटन्सकडून ट्रेड केले. हार्दिक संघात परतल्यासोबतच कर्णधार देखील बनला. दुसरीकडे पाच आयपीएल ट्रॉफी जिंकणारा कर्णदार रोहित शर्मा (Rohit Sharma) याला अंधारात ठेवून हा निर्णय घेतल्याच्या चर्चा देखील मोठ्या प्रमाणात झाला. रोहितने किंवा मुंबई फ्रँचायझीने अद्याप याविषयी कोणती प्रतिक्रिया दिली नव्हती. पण नुकतीच मुंबई इंडियन्सचे मुख्य प्रशिक्षक मार्क बाऊचर (Mark Boucher) यांची एक मुलाखत समोर आली आहे.
मुलाखतीत बाऊचर रोहितला मुंबईच्या कर्णधारपदावरून हटवण्याबाबत बोलत आहेत. त्यांच्या मते पूर्णपणे क्रिकेटचा विचार आणि संघाचे भविष्य लक्षात घेऊन हार्दिकला कर्णधार बनवले गेले आहे. पण याच व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये रोहितची पत्नी रितिका सजदेह (Ritika Sajdeh) हिने नाराजी व्यक्त केली. रितिकाच्या कमेंटमधून असे समजते की, शर्मा कुटुंबाला मुंबई फ्रँचायझीचा निर्णय नक्कीच पटला नाहीये.
स्मॅश स्पोर्ट्स या पॉडकास्टवर मार्क बाऊचर म्हणाले, “हार्दिक पंड्याला मुंबई इंडियन्सचा कर्णधार बनवणे, हा निव्वळ क्रिकेटचा विचार करून घेतला गेलेला निर्णय होता. हार्दिकला संघात पुन्हा घेण्यासाठी ही योग्य वेळ आहे, असे आम्हाला वाटले. हा बदल करण्याचा काळ आहे. भारतातील अनेकांना हे समजत नाहीये. चाहते खूप भावून होतात.” बाऊचर यांची मुलाखत पाहिल्यानंतर रितिका सजदेह देखील आपल्या भावनांवर नियंत्रण ठेऊ शकली नाही. तिने कमेंट केली आहे की, “यात अनेक गोष्टी चुकीच्या आहेत.” रितिकाच्या या एका कमेंटमुळे क्रिकेटविश्वात नव्या वादाला तोंड फुटले आहे. रोहितला कर्णधारपदावरून हटवण्याचा निर्णय कितपत योग्य होता, यावर पुन्हा एकदा चाहत्यांमध्ये चर्चा सुरू झाल्या आहेत.
View this post on Instagram
दरम्यान, हार्दिक पंड्या 2015 मध्ये पहिल्यांदा मुंबई इंडियन्सकडून खेळला होता. त्याने आयपीएलमध्ये स्वतःची गुणवत्ता सुद्ध केल्यानंतर भारतीय संघात स्थान मिळवले. आयपीएल 2022 आधी मात्र त्याला मुंबई इंडियन्सने रिलिज केले आणि लिलावात देखील संघ त्याला खरेदी करू शकला नाही. नव्याने आयपीएलमध्ये सहभागी होणाऱ्या गुजरात टायटन्सने हार्दिकसाठी 15 कोटी रुपये खर्च करून त्याला कर्णधारपद देखील दिले. कर्णधाराच्या रुपात पहिल्याच हंगामात हार्दिकने गुजरात आयपीएल ट्रॉफी मिळवून दिली. मागच्या आयपीएल हंगामात देखील त्याच्या नेतृत्वात गुजरात संघ उपविजेता ठरला. आगामी हंगामात हार्दिक मुंबईचे नेतृत्व करताना काय कमला दाखवतो, हे पाहण्यासारखे असेल. तसेच रोहितला त्याच्या नेतृत्वात खेळताना पाहणे, हा चाहत्यांसाठी वेगळा अनुभव असेल. (Ritika Sajdeh comment on making Hardik Pandya the captain of Mumbai Indians)
महत्वाच्या बातम्या –
मुंबई ओपनमध्ये भारताच्या श्रीवल्ली रश्मिका भामीदिप्तीचा मुख्य फेरीत प्रवेश
धक्कादायक! कॅरेबियन खेळाडूला दाखवला बंदुकीचा धाक, एसए20 लीगमध्ये खेळाडूंच्या सुरक्षेबाबत मोठा प्रश्न