---Advertisement---

रोहित शर्मा दुसऱ्यांदा बनणार बाबा? रितिका सजदेहच्या ‘त्या’ व्हिडिओमुळे चर्चांना उधाण

On: शुक्रवार, ऑगस्ट 23, 2024 9:11 PM
Rohit-Ritika-Sharma
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघाचा विश्वविजेता कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आपल्या खेळामुळे आणि नेतृत्त्वामुळे चर्चेत असतो. बऱ्याचदा वैयक्तिक आयुष्यामुळेही तो चर्चेचा विषय बनत असतो. रोहितची पत्नी रितिका सजदेह हिलाही वेगळ्या ओळखीची गरज नाही. रितिका तिच्या लूकमुळे चर्चेत असते आणि प्रत्येक संधीवर तिचा पती रोहितला पाठींबा देत असते. दरम्यान, रितीकाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. रितिकाच्या या व्हिडीओनंतर रोहित दुसऱ्यांदा बाप होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

खरे तर, रितिकाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यामध्ये चाहत्यांना वाटते की तिचा बेबी बंप दिसत आहे. यानंतर ती पुन्हा आई होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. रोहित आणि रितिका यांचे 2015 मध्ये लग्न झाले होते. त्यानंतर 30 डिसेंबर 2018 रोजी दोघेही एका मुलीचे पालक बनले. त्यांच्या मुलीचे नाव समायरा आहे. ती अनेकदा रितिकासोबत स्टेडियममध्ये वडिलांच्या मॅचेस एन्जॉय करताना दिसते.

21 ऑगस्ट रोजी रोहितला सीएट अवॉर्ड्समध्ये सन्मानित करण्यात आले. पती रोहितसोबत रितीका या पुरस्कार सोहळ्यासाठी आली होती. या पुरस्कार सोहळ्यादरम्यान निळ्या रंगाच्या ड्रेसमधील रितिकाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये रितिकाच्या पोटाचा आकार पाहून तिला बेबी बंप असल्याचा अंदाज फॅन्स लावत आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. मात्र रोहित आणि रितिका किंवा त्यांच्या जवळच्या कोणाकडूनही यावर कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

दरम्यान सध्या रोहित शर्मा क्रिकेटमधून विश्रांतीवर आहे. तो 19 सप्टेंबरपासून बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेत खेळताना दिसणार आहे.

अशी जुळली रोहित आणि रितिकाची मने
रितिका सजदेहने स्पोर्ट्स इव्हेंट मॅनेजर आणि व्यवसायाने पीआर म्हणून काम केले आहे. अनेक क्रिकेटपटूंशी तिचा संवाद होता. यादरम्यान तिची युवराज सिंगसोबतही ओळख झाली होती. युवराजही रितिकाला आपली बहीण मानतो. युवराजच्या माध्यमातूनच रोहित आणि रितिका यांची पहिली भेट झाली. यानंतर दोघांमध्ये प्रेम फुलले आणि त्यांनी 2015 मध्ये लग्न केले.

हेही वाचा – 

इशान किशनने वाढवली प्रशिक्षक गंभीरची डोकेदुखी! फलंदाजीनंतर गोलंदाजीत करतोय कमाल

बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी डेंग्यूतून सावरला वेगवान गोलंदाज, दुलीप ट्रॉफीत खेळणार

ऑस्ट्रेलियाकडून खेळणार भारतीय वंशाच्या 3 क्रिकेटपटू, ‘या’ क्रिकेट मालिकेत घडणार नवीन पराक्रम

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---