---Advertisement---

चेन्नई सुपर किंग्जसाठी आनंदाची बातमी; ‘हा’ खेळाडू संघात परतला

On: सोमवार, सप्टेंबर 21, 2020 12:48 PM
---Advertisement---

मुंबई । चेन्नई सुपरकिंग्सचा स्टार फलंदाज ऋतुराज गायकवाड याने रविवारपासून सरावाला सुरुवात केली आहे. ऋतुराजने सराव करत असतानाचे काही फोटो चेन्नई सुपर किंग्सने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले आहेत. चेन्नईचा संघ दुबईमध्ये पोहोचतात दोन खेळाडूंसह एकूण 13 सदस्यांना कोरोना या विषाणूची लागण झाली होती. या दोन खेळाडूंमध्ये दीपक चहर आणि ऋतुराज गायकवाड यांचा समावेश होता.

दीपक चहर कोरोना मुक्त झाल्यानंतर तो चेन्नईच्या संघात दाखल झाला, मात्र ऋतुराज गायकवाडचा दुसरा कोरोना टेस्ट अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्याला पुन्हा क्वारंटाइनमध्ये राहावे लागले. दुबईत आल्यापासून ऋतुराज हा क्वारंटाइनमध्ये होता. त्यामुळे तो मुंबई इंडियन्स विरुद्धच्या आयपीएलमधील पहिल्या सामन्यात खेळू शकला नाही. पण आता ऋतुराजच्या दुसरा कोरोना टेस्टचा अहवाल निगेटिव्ह आल्याने तो आता जैव-सुरक्षित वातावरणात आला असून संघासोबत सरावाला सुरवात केली आहे.

या आयपीएल हंगामापूर्वी चेन्नई सुपर किंग्जचा स्टार फलंदाज सुरेश रैना हा कौटुंबिक कारणास्तव आयपीएलमध्ये खेळण्यास नकार देत मायदेशी परतला. त्यामुळे त्याच्या जागेवर खेळण्यासाठी ऋतुराज हा प्रबळ दावेदार आहे. चेन्नई सुपर किंग्जला देखील ऋतुराज कडून मोठ्या कामगिरीची अपेक्षा आहे. चेन्नईच्या दुसर्‍या सामन्यापूर्वी ऋतुराजने आपली फिटनेस टेस्ट देखील पास झाला आहे. त्यामुळे तो चेन्नईच्या पुढच्या सामन्यात संघात खेळताना दिसू शकतो.

आयपीएलच्या पहिल्या सामन्यात चेन्नई सुपरकिंग्जने मुंबई इंडियन्सचा पराभव केला होता. चेन्नईचा पुढचा सामना राजस्थान रॉयल्सविरुद्ध उद्या, मंगळवारी 22 सप्टेंबर रोजी शारजाहच्या मैदानावर होणार आहे.

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---