१९ सप्टेंबरपासून युएईमध्ये आयपीएलच्या १३ व्या हंगामाला सुरुवात होणार आहे. मात्र आयपीएल सुरु होण्याआधीच चेन्नई सुपर किंग्सला जबरदस्त धक्का बसला आहे. चेन्नईचा उपकर्णधार सुरेश रैना वैयक्तिक कारणामुळे या आयपीएल हंगामातून बाहेर पडला आहे. याबद्दल सीएसके व्यवस्थापनाने ट्विटरद्वारे माहिती दिली आहे.
रैनाचे आयपीएलला मुकणे चेन्नई संघासाठी अतिशय महागात पडू शकते. ‘मिस्टर आयपीएल’ म्हणून ओळखला जाणारा रैना आयपीएल इतिहासात सर्वाधिक धावा काढणाऱ्या खेळाडूंच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. रैनाने आत्तापर्यंत १९३ आयपीएल सामने खेळत ३३.३४ च्या सरासरीने ५,३६८ धावा काढल्या आहेत.
रैना आयपीएलमधून बाहेर पडल्याने महाराष्ट्र रणजी संघाचा सलामीवीर ऋतुराज गायकवाडला चेन्नई संघाकडून आयपीएलमध्ये खेळण्यासाठी संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील पारगावचा रहिवासी असलेला २३ वर्षीय ऋतुराज २०१६ पासून महाराष्ट्र संघाचा नियमित सदस्य आहे.
सलामीवीर म्हणून उत्तमोत्तम कामगिरी करत ऋतुराजने भारतीय अ संघात जागा मिळवली आहे. भारताचा सार्वकालीन महान फलंदाज व राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा संचालक राहुल द्रविड ऋतुराजचे तोंडभरून कौतुक करतो. ऋतुराज २०१९ देवधर ट्रॉफीमध्ये इंडिया बी व दुलीप ट्रॉफीमध्ये इंडिया ब्ल्यू संघाचा सदस्य राहिला आहे. ऋतुराजच्या नावे २८ टी२० सामन्यात ८४३ धावा आहेत.
२०१९ आयपीएल लिलाववेळी, चेन्नई सुपर किंग्स संघाने त्याच्यावर ३० लाखांची बोली लावत, आपल्या चमूत सामील करून घेतले होते. पहिल्या वर्षी त्याला पदार्पणाची संधी मिळाली नसली तरी चेन्नई व्यवस्थापनाने त्याच्यावर विश्वास दाखवत २०२० आयपीएल हंगामासाठी त्याला संघात राखले आहे.
आता, रैनाच्या अचानकपणे आयपीएलमधून बाजूला होण्याचा निर्णयामुळे, ऋतुराज संघासाठी सलामीवीराची भूमिका निभावताना पाहायला मिळू शकतो. गेली दोन हंगाम सलामीला येणारा अनुभवी अंबाती रायडू तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना दिसू शकतो.
महत्त्वाच्या बातम्या –
सुरेश रैनाच्या बाहेर जाण्याने आयपीएल इतिहासातील सर्वात मोठ्या विक्रमाला लागणार ब्रेक
आयपीएलमध्ये चेन्नईकडून खेळणारा पुणेकर क्रिकेटर कोरोना पाॅझिटिव्ह
मोठी बातमी – सीएसकेचा फलंदाज सुरेश रैना आयपीएल २०२० मधून बाहेर
ट्रेंडिंग लेख –
एकाच ओव्हरमध्ये ३० धावा काढणारे आयपीएलमधील ५ सुपरस्टार, एकाने तर ३७ धावांचा केलाय कारनामा
IPLमध्ये सामन्यात सीएसकडेकडून सर्वाधिक धावा करणारे ३ सुपरस्टार, तिसरे नाव आश्चर्यकारक
१० कोटी रुपये मिळूनही आयपीएलमध्ये सुपर डुपर फ्लाॅप ठरलेले ३ भारतीय खेळाडू