---Advertisement---

लय भारी! सीएसकेला मिळाला धोनीचा मराठमोळा उत्तराधिकारी!

---Advertisement---

आयपीएल 2025चा मेगा लिलाव (Mega Auction) सौदी अरेबियातील जेद्दाह येथे (24 ते 25 नोव्हेंबर) दरम्यान पार पडला. यावेळी चेन्नई सुपर किंग्जने (Chennai Super Kings) लिलावात डेव्हाॅन कॉनवे (Devon Conway) आणि वंश बेदी (Vansh Bedi) यांना यष्टीरक्षक फलंदाज म्हणून खरेदी केले आहे. त्यांच्याकडे अनुभवी महेंद्रसिंह धोनी (Mahendra Singh Dhoni) देखील आहे, जो आगामी हंगामात यष्टीरक्षकाच्या भूमिकेत दिसेल. हे सर्व माहीत असूनही, सीएसके कर्णधार रूतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) सय्यद मुश्ताक अली ट्राॅफीमध्ये यष्टीरक्षाच्या भूमिकेत दिसला.

काही कारणास्तव, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी (SMAT) 2024-25 मध्ये महाराष्ट्राचे नेतृत्व करणारा चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार रूतुराज गायकवाड गोव्याविरूद्ध यष्टीरक्षण करत होता. खेळाच्या सुरुवातीला गायकवाडने इतर फलंदाजांना फलंदाजीची संधी देऊन 7व्या क्रमांकावर फलंदाजी करायचं ठरवले होते. 194 धावांचा बचाव करताना त्यानेच महाराष्ट्राचा नियुक्त यष्टीरक्षक निखिल नाईक ऐवजी ग्लोव्हज घेतले आणि यष्टीरक्षण केले.

रुतुराज गायकवाडने (Ruturaj Gaikwad) हे केवळ गंमत म्हणून केले की नाही, हे अद्याप स्पष्ट झाले नाही. माहितीनुसार, निखिल नाईक दुखापत झाली नाही. पण गायकवाडने महाराष्ट्रासाठी यष्टीरक्षण करण्याची ही पहिलीच वेळ नाही. त्याने वर्षाच्या सुरूवातीला महाराष्ट्र प्रीमियर लीगमध्ये विकेट्स राखल्या आणि सय्यद मुश्ताक अली ट्राॅफीमध्ये दोनदा (2023 आणि 2022) यष्टीरक्षण केले आहे. गोव्याविरूद्धही त्याने यष्टिमागे चांगली कामगिरी केली. दुसऱ्या डावातील पहिल्याच षटकात त्याने 2 झेल घेतले. यासह महाराष्ट्राने विजयाकडे वाटचाल केली.

महत्त्वाच्या बातम्या-

5 संघांनी खेळले सर्वाधिक टी20 आंतरराष्ट्रीय सामने, पाकिस्तानने रचला इतिहास…!
IND vs AUS; बुमराहला घाबरलाय कांगारू संघ? ऑस्ट्रेलिया खेळाडूचे मोठे वक्तव्य
IND vs AUS; दुसऱ्या कसोटीपूर्वी माजी दिग्गजाचा ऑस्ट्रेलियाला सल्ला! म्हणाला…

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---