भारतीय क्रिकेट संघ सध्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ५ सामन्यांची टी२० मालिका खेळत आहे. या मालिकेत भारतीय संघातील काही वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. परिणामी बऱ्याचशा युवा खेळाडूंना भारताच्या ताफ्यात जागा मिळाली आहे. दरम्यान इंडियन प्रीमियर लीगच्या पंधराव्या हंगामातून (आयपीएल २०२२) चर्चेत आलेल्या राजस्थान रॉयल्स संघाच्या युवा क्रिकेटपटू रियान पराग याने आपल्या भारतीय संघातील निवडीबाबत प्रतिक्रिया दिली आहे.
आयपीएल २०२२च्या (IPL 2022) हंगामात परागला (Riyan Parag) विशेष धमक दाखवता आली नव्हती. तो फक्त १-२ सामन्यात राजस्थान संघाच्या विजयात योगदान देऊ शकला होता. यानंतर आता परागने स्वत मान्य केले आहे की, आपले आयपीएलमधील प्रदर्शन म्हणावे तितके प्रभावी राहिले नाही. तसेच त्याने भारतीय संघात निवडीसाठीही स्वत:ला (Riyan Parag On Indian Team Selection) अपात्र संबोधले आहे.
‘स्पोर्ट्स तक’शी बोलताना पराग म्हणाला की, “माझ्या संघासाठी सामने जिंकणे गरजेचे आहे. मी काही सामन्यांमध्ये संघाला विजय मिळवून दिले, परंतु ते पुरेसे नव्हते. जर मी कोणत्या क्रिकेट स्पर्धेत माझ्या संघाला ६-७ सामने जिंकून देऊ शकतो, तर मी निवडक खेळाडूंमध्ये असेल. जर आता माझे नाव भारतीय संघाच्या संभाव्य यादीत जरी आले, तरीही मला चांगले वाटणार नाही. कारण मी आताच यासाठी पात्र नाही.”
“येणाऱ्या हंगामात जर मी माझ्या संघाला विजयासाठी मार्गदर्शन करू शकलो, तर माझा आत्मविश्वास वाढेल. मला सहाव्या-सातव्या क्रमांकावर फलंदाजी करताना चांगले प्रदर्शन करायचे आहे. जर तुम्ही पाहिले तर, फक्त एमएस धोनी आहे, ज्याने स्वतला एका फिनिशरच्या रूपात स्थापित केले आहे. मी त्यांची प्रेरणा घेत खूप काही शिकत असतो आणि ते माझ्या खेळातही लागू करण्याचा प्रयत्न करत असतो,” असेही २० वर्षीय परागने पुढे म्हटले.
दरम्यान रियानने राजस्थान संघाचे प्रतिनिधित्त्व करताना आयपीएल २०२२मध्ये ७ सामन्यांत केवळ १८३ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याची सरासरी १६.६४ इतकीच राहिली आहे. तसेच तो फक्त एक अर्धशतक करू शकला आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
भारतीय खेळाडूंच्या जर्सी नंबरमागील फंडा आहे तरी काय? जाणून घ्या एका क्लिकवर
INDvsSA: आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये ‘तो’ महापराक्रम करण्यासाठी भुवनेश्वर फक्त एक पाऊल दूर
INDvsSA T20: कार्तिकच्या आधी अक्षर पटेल फलंदाजीला आल्याने भारताच्या माजी दिग्गजाने सुनावले खडे बोल





