देवधर ट्रॉफी स्पर्धेचा अंतिम सामना गुरुवारी (3 ऑगस्ट) खेळला गेला. पॉंडेचेरी येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात दक्षिण विभागाने पूर्व विभागाचा 45 धावांनी पराभव करत विजेतेपद पटकावले. पूर्व विभागाला अंतिम सामन्यात पराभूत व्हावे लागले असले तरी, संघाचा अष्टपैलू रियान पराग हा स्पर्धेचा मानकरी ठरला. त्यानंतर दिलेल्या एका मुलाखतीत बोलताना त्याने आपण अष्टपैलूच असल्याचे म्हटले.
देवधर ट्रॉफी मधील चांगल्या कामगिरीनंतर त्याने नुकतीच एका आघाडीच्या वृत्तसंस्थेला मुलाखत दिली. यावेळी बोलताना त्याने आपल्यावर टीका करणाऱ्या तसेच आपल्याला केवळ फलंदाज म्हणून महत्व देणाऱ्या व्यक्तींना प्रतिउत्तर दिले. तो म्हणाला,
“मी हे ठासून सांगू शकतो की मी एक अष्टपैलू आहे. जे लोक देशांतर्गत क्रिकेट जवळून पाहतात त्यांना माहित असेल की, मी रणजी ट्रॉफी मध्ये किती षटके गोलंदाजी करतो. त्यामुळे मी स्वतःला 100 टक्के अष्टपैलू म्हणून शकतो.”
याच मुलाखतीत त्याने परागला एटीट्यूड प्रॉब्लेम आहे असे म्हणणाऱ्यांना देखील फैलावर घेतले. मी केलेले सेलिब्रेशन, मी खाल्लेला चुईंगम तसेच माझ्यावर केलेल्या कॉलरचा अनेकांना त्रास होतो. मात्र, मी असाच आहे त्यामुळे या गोष्टी फारशा मनावर घेत नाही असे देखील कबूल त्याने दिली.
देवधर ट्रॉफी स्पर्धेत रियान पराग याने 5 सामन्यात 2 शतक व एका अर्धशतकाच्या मदतीने 354 धावा चोपल्या. विशेष म्हणजे, रियानने यादरम्यान 30 चौकार आणि सर्वाधिक 23 षटकारही मारले आहेत. तसेच, गोलंदाजी करताना त्याने 5 सामन्यात 11 विकेट्सही घेतल्या. काही दिवसांपूर्वी झालेल्या इमर्जिंग एशिया कपमध्ये देखील गोलंदाजी तो चमकला होता.
(Riyan Parag Said Am 100 Percent All Rounder He Shines In Deodhar Trophy)
महत्वाच्या बातम्या:
ब्रेकिंग! पाकिस्तानचे माजी कर्णधार इम्रान खान यांना 3 वर्षांची शिक्षा, काय आहे नेमकं प्रकरण?
विराटने ज्या गोलंदाजाला चोपले, कार्तिकने त्याचेच गायले गोडवे; म्हणाला, ‘तो डेथ ओव्हर स्पेशलिस्ट…’