राजस्थान रॉयल्स संघाचा अष्टपैलू खेळाडू रियान परागने गेल्या काही काळात चमकदार कामगिरी करून लक्ष वेधले आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये रियान पराग पूर्वीपासूनच खेळतो आहे. मात्र त्याला आयपीएल मधील कामगिरीने खरी ओळख मिळाली. आयपीएलमध्ये राजस्थानकडून खेळतांना त्याने फलंदाजी आणि गोलंदाजी अशा दोन्ही विभागात त्याने शानदार कामगिरी करत आपली दखल घ्यायला भाग पाडले होते.
मात्र रियान पराग आता एका वेगळ्या कारणाने चर्चेत आला आहे. नुकतेच त्याने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन चाहत्यांशी प्रश्नोत्तर स्वरूपात गप्पा मारल्या. यावेळी एका चाहत्याने त्याला आत्तापर्यंत कुठल्या सेलिब्रेटीची घेतलेली स्वाक्षरी सर्वाधिक आवडली, असा प्रश्न विचारला. यावर रियानने दिलेल्या उत्तराने चाहत्यांची मने जिंकली आहेत.
‘ही’ स्वाक्षरी सगळ्यांत आवडती
रियान परागने चाहत्यांना प्रश्न विचारायचे आवाहन केले होते. त्यातील निवडक प्रश्नांना त्याने उत्तर देखील दिली. यातच एका चाहत्याने त्याला कुठल्या सेलिब्रिटीची घेतलेली स्वाक्षरी सर्वाधिक आवडली, असा प्रश्न विचारला. यावर रियानने आपल्या बॅटचा फोटो शेअर केला. ज्यावर विराट कोहलीची स्वाक्षरी आहे. विराट कोहलीने रियानच्या बॅटवर स्वाक्षरी देतांना एक खास संदेश देखील लिहिला होता. ‘प्रिय रियान, खेळाचा आनंद घे. शुभेच्छा’, असे लिहून कोहलीने बॅटवर आपली स्वाक्षरी केली होती. हाच फोटो शेअर करत रियानने ही आपली आवडती स्वाक्षरी असल्याचे सूचित केले आहे.
The signed bat of Riyan Parag by Virat Kohli. pic.twitter.com/jXVhJu6mJ1
— Johns. (@CricCrazyJohns) June 6, 2021
दरम्यान, आयपीएलच्या यंदाच्या हंगामात रियान परागची कामगिरी फार खास झाली नाही. त्याने ६ डावात फलंदाजी करतांना केवळ ७८ धावा केल्या होत्या. मात्र हा आयपीएल हंगाम कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मध्यातच स्थगित करावा लागला होता. आता उर्वरित सामने येत्या सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात संयुक्त अरब अमिरातीत अर्थात युएईमध्ये खेळवण्यात येणार आहेत. त्यावेळी आपल्या कामगिरीत सुधारणा करून राजस्थान रॉयल्सला बाद फेरी गाठून देण्याचे लक्ष्य रियान परागचे असेल.
महत्त्वाच्या बातम्या –
फाफ डू प्लेसिस म्हणतोय, ‘या’बाबतीत आयपीएलपेक्षा सरस आहे पीएसएल