पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्या दरम्यान कराची येथे मंगळवार (२६ जानेवारी) पासून तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात झाली. प्रथम फलंदाजी करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेसाठी पहिला दिवस अत्यंत निराशाजनक ठरला. दक्षिण आफ्रिका संघ पहिल्या दिवशी अवघ्या २२० धावा काढून सर्वबाद झाला. पाकिस्तानी गोलंदाज व क्षेत्ररक्षकांनी अफलातून कामगिरी करत दक्षिण आफ्रिकेचा धावसंख्येला वेसण घातली. त्यातच, पाकिस्तानचा यष्टीरक्षक मोहम्मद रिजवान याने एक चमत्कारिक धावबाद करत सर्वांची वाहवा मिळवली. रिजवानच्या या दर्जेदार क्षेत्ररक्षणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच गाजत आहे.
नाणेफेक जिंकत दक्षिण आफ्रिकेने केली फलंदाजी
दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार क्विंटन डी कॉकने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. सलामीवीर एडेन मार्करम लवकर बाद झाल्यानंतर वॅन डर डसेन तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरला. डीन एल्गरसोबत दक्षिण आफ्रिकेचा डाव पुढे नेत असताना डाव पुढे नेत असताना, पाकिस्तानचा यष्टीरक्षक मोहम्मद रिजवानच्या चपळाईने डसेनची खेळी १७ धावांवर संपुष्टात आली.
रिजवानने सूर मारत केले धावबाद
दक्षिण आफ्रिकेच्या डावातील सोळाव्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर डसेनने कव्हर्सच्या दिशेने फटका खेळला. डसेन एक धाव काढण्यासाठी इच्छुक होता. मात्र, एल्गरने त्याला परत पाठवले. इतक्यात पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने चेंडू उचलत रिजवानकडे फेकला. रिजवानने चपळता दाखवत सूर मारून डसेनला बाद केले. रिजवानने केलेल्या या धावबादेची तुलना अनेकजण दिग्गज क्षेत्ररक्षक जोंटी रोड्सशी करत आहेत.
Mohammad Rizwan doing @iMRizwanPak things ⚡️
Watch #PAKvSA Live: https://t.co/rvyBajG99F#HarHaalMainCricket #BackTheBoysInGreen pic.twitter.com/o0OQY6eKnk
— Pakistan Cricket (@TheRealPCB) January 26, 2021
तेरा वर्षानंतर पाकिस्तानात खेळत आहे दक्षिण आफ्रिका
श्रीलंका संघावर २००९ मध्ये दहशतवादी हल्ला झाल्यानंतर पाकिस्तानात क्रिकेट खेळण्यास नकार दिला होता. २०१५ पासून काही सहयोगी संघांनी पाकिस्तानमध्ये खेळण्यास सुरुवात केली होती. दक्षिण आफ्रिका संघाने २००७-०८ मध्ये पाकिस्तानचा दौरा केला होता. त्यानंतर २०१०-११ व २०१३-१४ या दोन दौर्यात युएई येथे पाकिस्तानशी दोन हात केले.
महत्वाच्या बातम्या:
मोठी बातमी! सौरव गांगुलीची तब्येत पुन्हा बिघडली; हॉस्पिटलमध्ये दाखल
ब्रेकिंग! आयपीएल २०२१ लिलावाची तारीख आणि ठिकाण ठरले; फेब्रुवारीत या दिवशी होणार लिलाव
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी : तामिळनाडूचा विजयरथ सुसाट, हिमाचल प्रदेशचा पराभव करत उपांत्य फेरीत धडक