---Advertisement---

नीरज चोप्रासाठी ‘उडे जब जब जुल्फे तेरी’ गाण्यावर थिरकल्या मुली; तर ‘गोल्डन बॉय’ झाला लाजून चूर

On: शुक्रवार, ऑगस्ट 20, 2021 6:54 PM
---Advertisement---

टोकियो ऑलिम्पिक २०२० मधील भारताचा ‘गोल्डन बॉय’ नीरज चोप्रा सध्या सतत चर्चेत असतो. नीरज चोप्राने ऑलिम्पिकमध्ये ॲथलेटिक्समधील देशासाठी पहिले सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला. १०० पेक्षा जास्त वर्षांच्या इतिहासातील ट्रॅक अँड फील्डमधील हे भारताचे पहिले पदक आहे. नीरजने पुरुषांच्या भालाफेकीच्या अंतिम फेरीत ८७.५८ मीटरच्या सर्वोत्तम फेकीसह सुवर्णपदक जिंकले. टोकियोहून परतल्यानंतर नीरज आजकाल सन्मान समारंभ आणि मुलाखतींमध्ये प्रचंड व्यस्त आहे.

सध्या रेडिओ जॉकी मलिष्काने घेतलेली नीरज चोप्राची मुलाखत सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. मलिष्काने तिच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये मलिष्का आणि काही मुली नीरजला इंप्रेस करण्यासाठी त्याच्यासमोर ‘उडे जब जब जुल्फेन तेरी’ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत.

या मुलींना डान्स करताना पाहून नीरज देखील हसत आणि लाजत आहे. व्हिडिओच्या शेवटी, मलिष्का नीरजला म्हणाली की, आम्ही तुला जास्त छेडले तर नाही ना. यावर नीरज तिला ‘तुझे खूप खूप आभार आहे’ म्हणाला.

खरं तर, २३ वर्षीय नीरज टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकल्यानंतर मुलींमध्ये प्रचंड लोकप्रिय झाला आहे. मुलाखतीदरम्यान, अनेक मुलींनी त्याला वेळा अनेकदा गर्लफ्रेंड आणि लग्नाबद्दल देखील प्रश्न विचारले. परंतू, या प्रश्नाचे उत्तर देताना तो नेहमी लाजतो. टोकियो ऑलिम्पिकच्या यशामुळे नीरजचे सोशल उन मीडियावर फॉलोअर्स देखील झपाट्याने वाढले आहेत. त्याच्या फॉलोअर्स संख्येमध्ये मुलींची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.

मुलाखतीदरम्यान, मलिष्का नीरजला मिठी देखील मागते. त्यावर तो असच लांबून नमस्ते म्हणतो. नीरजचा हा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे.

मैत्रीण आणि लग्नाच्या प्रश्नावर नीरज चोप्राने प्रत्येक मुलाखतीत एकच उत्तर दिले आहे. त्याने म्हटले आहे की, त्याला कोणतीही मैत्रीण नाही आणि आत्तापर्यंत त्याने लग्न करण्याचा देखील कोणताही विचार केलेला नाही. त्यानंतर तो म्हणाला की, त्याचे संपूर्ण लक्ष आता खेळ आणि आगामी स्पर्धांवर आहे.

नीरजने सांगितलं की, सध्या त्याला खूप प्रेम मिळत आहे. ही एक मोठी गोष्ट आहे. आगामी वर्षे आशियाई खेळ आणि जागतिक अजिंक्यपद स्पर्धा आणि ऑलिम्पिकपर्यंत नेणाऱ्या इतर स्पर्धांसाठी महत्त्वपूर्ण आहेत, म्हणूनच त्याला त्याच्या खेळावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करायचे आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

व्हिलचेअर असूनही स्टुअर्ट ब्रॉडच्या चेहऱ्यावरील स्मितहास्याने जिंकले चाहत्यांचे मन, फोटो व्हायरल

“… म्हणून मला लॉर्ड्स कसोटीत संधी मिळाली नाही”, स्वतः अश्विनने केला खुलासा

क्रिकेट इतिहासातील इंग्लंड-पाकिस्तानचा ‘तो’ सामना, ज्याचा तीनदा लागला निकाल; इंझमामवर ४ वनडेचीही लागली बंदी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---