---Advertisement---

“शोएब अख्तरने मला धमकी दिलेली”, रॉबिन उथप्पाने केला खळबळजनक दावा

On: शनिवार, मे 15, 2021 11:48 PM
---Advertisement---

शोएब अख्तर हा जगातील आतापर्यंतचा सर्वाधिक वेगवान गोलंदाज मानला जातो. पाकिस्तानचा हा माजी वेगवान गोलंदाज आपल्या वेगाने फलंदाजांमध्ये भीती निर्माण करत. अनेक फलंदाजांना अख्तरच्या चेंडूंनी दुखापत झाली आहे. अख्तर नेहमीच अशी गोलंदाजी करत ज्यामुळे फलंदाजांचा थरकाप उडत. अशाच एका घटनेचा उल्लेख रॉबिन उथप्पाने केला आहे ज्यात अख्तरने त्याला एक इशारा दिला होता.

उथप्पाने सांगितली आठवण
एका यूट्यूब चॅनलवर बोलताना रॉबिन उथप्पा म्हणाला की, “आम्ही गुवाहाटीमध्ये एक सामना खेळत होतो. हे ठिकाण भारताच्या पूर्वेस आहे म्हणून तेथे लवकर अंधार होतो. तेव्हा दोन नवीन चेंडू मिळत नसत. ३४ षटकांनंतर दुसरा चेंडू मिळत, जो २४ षटके जुना असत. शोएब गोलंदाजी करत होता. मी आणि इरफान फलंदाजी करत होतो.’

‘मला आठवते की त्याने मला यॉर्कर फेकला. मी तो चेंडू तटवून काढला. तो ताशी १५४ किलोमीटर प्रतितास इतक्या वेगाचा होता. पुढचा चेंडू लो फुल टॉस होता आणि मी चौकार ठोकला. त्यानंतर आम्हाला जिंकण्यासाठी ३-४ धावांची गरज होती आणि मी स्वतःला म्हणालो, ‘यार, मला शोएब अख्तरला सामोरे गेले पाहिजे. त्याला फटका मारून सामना जिंकून घेण्याची संधी वारंवार मिळणार नाही. त्याने चेंडू टाकला आणि मीही पुन्हा चौकार ठोकत संघाला विजय मिळवून दिला.”

त्यानंतरचा किस्सा सांगताना उथप्पा म्हणाला,”पुढील सामना ग्वाल्हेर येथे होता. आम्ही दुपारचे जेवण करून कोणाच्या तरी खोलीत गेलो. नेमका शोएब तेथे हजर होता. त्याने माझे कौतुक करताना म्हटले, छान खेळलास रॉबिन. मात्र, पुढील वेळी तू पुढे येऊन फटका मारण्याचा प्रयत्न केल्यास मी तुझ्या डोक्यावर बीमर टाकू शकतो. त्यानंतर मी पुन्हा कधीही त्याला पुढे येऊन फटके मारले नाहीत.”

रॉबिन उथप्पा मागील अनेक वर्षांपासून भारतीय संघाच्या बाहेर आहे. आयपीएल २०२१ मध्ये तो चेन्नई सुपर किंग्सचा भाग होता. परंतु, त्याला एकाही सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नाही.

महत्त्वाच्या बातम्या –

ऑस्ट्रेलियन क्रिकेट वर्तुळात उडाली खळबळ! बॉल टेम्परिंग प्रकरणाची होऊ शकते पुन्हा चौकशी

“करारबद्ध खेळाडू असताना बीसीसीआयने वेदाशी कोणताही संपर्क साधलेला नाही”, लिसा स्थळेकरने फटकारले

जोफ्रा आर्चरच्या घातक बाऊन्सरने फलंदाज कोसळला जमिनीवर, पाहा व्हिडिओ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---