भारतीय क्रिकेट संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग सध्या चर्चेचा विषय आहे. संघाचा माजी फलंदाज रॉबिन उथप्पाने अलिकडेच दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते की, विराट कोहलीमुळे युवराज सिंगची कारकीर्द संपली आणि त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घ्यावी लागली. उथप्पा म्हणाला की, कर्णधार विराट कोहलीने युवराज सिंग कर्करोगातून परतल्यानंतर त्याच्या तंदुरुस्तीबाबत कोणतीही तडजोड केली नाही. पण आता युवराज सिंगचा व्हायरल होत असलेला जुना व्हिडिओ वेगळेच सत्य सांगत असल्याचे दिसून येत आहे.
व्हायरल झालेला व्हिडिओ युवराज सिंगच्या मुलाखतीचा आहे जो सुमारे एक वर्ष जुना आहे, ज्यामध्ये तो असे म्हणत आहे की विराट कोहलीने त्याच्या पुनरागमनानंतर त्याला पाठिंबा दिला. न्यूज 18 ला दिलेल्या मुलाखतीत युवराज सिंगने विराट कोहलीबद्दल म्हटले होते की, “जेव्हा मी पुनरागमन केले तेव्हा विराटने मला साथ दिली. जर विराट कोहलीने मला साथ दिली नसती तर माझे पुनरागमन कधीच झाले नसते.”
btw this is what Yuvraj said with his own mouth https://t.co/nzuXhs461L pic.twitter.com/Qznvav9yWn
— soo washed (@anubhav__tweets) January 10, 2025
पुढे, युवराज सिंग धोनीबद्दल बोलताना तो म्हणाला, “धोनीचा विचार केला तर, त्याने मला 2019च्या विश्वचषकाबद्दल मला योग्य चित्र दाखवले की निवडकर्ते तुझ्याकडे पाहत नाहीयेत. त्याने मला योग्य चित्र दाखवले. त्याला जितके करता आले तेत त्याने केले.”
लल्लंटॉपला दिलेल्या मुलाखतीत रॉबिन उथप्पाने विराट कोहलीवर अनेक आरोप केले. तो म्हणाला की, कर्करोगातून पुनरागमन करताना कोहलीने युवराज सिंगला कोणतीही सवलत दिली नाही. युवीने क्षेत्ररक्षणात 2 गुणांची सवलत मागितली होती, पण विराट कोहलीने ती दिली नाही. त्यानंतर युवीने कसा तरी संघात स्थान मिळवले, परंतु फक्त एका मालिकेत खराब कामगिरी केल्यानंतर युवराजला वगळण्यात आले, जे त्याच्या कारकिर्दीसाठी चांगले ठरले नाही.
हेही वाचा-
“खेळाडूंची पूजा भारतीय क्रिकेटला मागे ढकलत आहे”, संजय मांजरेकरांचे खडे बोल
अश्विनच्या निवृत्तीपासून ते विराट-रोहितच्या भविष्यापर्यंत, बीसीसीआयच्या बैठकीत या मुद्द्यांवर होणार चर्चा
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी शुबमन गिलची जागा धोक्यात, हा खेळाडू करू शकतो टीम इंडियात धडाकेबाज एंट्री