नवी दिल्ली । भारतीय संघाचा फलंदाज रॉबिन उथप्पाला सेहवागप्रमाणे आक्रमक, पहिल्याच चेंडूपासूनच विरोधी संघाच्या गोलंदाजांविरुद्ध फटकेबाजी करण्यासाठी ओळखले जात होते. त्याच्याकडे फलंदाजीचे तंत्र आणि प्रतिभाही होती. परंतु अचानक एकेदिवशी त्याला भारतीय संघातून वगळण्यात आले आणि त्यानंतर त्याचे पुनरागमन झाले नाही.
आता त्याने वक्तव्य करत म्हटले होते की, २५ व्या वयात एक चूक झाली होती, ज्यामुळे त्याची आंतरराष्ट्रीय कारकीर्द खराब झाले होते.
‘तांत्रिक बदल करण्याचा प्रयत्न केला’-
उथप्पाला असे वाटते की, वयाच्या २५ व्या वर्षी कसोटी क्रिकेट खेळण्याच्या महत्वाकांक्षेमुळे त्याने फलंदाजीचे तंत्र बदलण्यात चूक केली होती. उथप्पाचे वय आता ३४ वर्षे आहे आणि त्याने भारताकडून शेवटचा सामना २०१५मध्ये झिंबाब्वेविरुद्ध खेळला होता.
त्याने राजस्थान रॉयल्सच्या (Rajasthan Royals) पॉडकास्ट सेशनदरम्यान म्हटले की, “माझे सर्वात मोठे लक्ष हे भारताकडून कसोटी क्रिकेट खेळणे होते. जर मी २०-२१ व्या वयात असा प्रयत्न केला असता, तर मी नक्कीच कसोटी क्रिकेट खेळले असते. मला माझ्या कारकीर्दीच्या शेवटची पश्चाताप नको होता. तसेच मला सर्वोत्तम कामगिरी करायची होती.”
उथप्पाने प्रवीण आमरेची (Pravin Amre) मदत घेतली आणि आपल्या तंत्रात काही बदल केले. परंतु यामुळे त्याची आक्रमक खेळी हरवली होती. तो म्हणाला की, “मी २५ वर्षांच्या वयात आमरेच्या देखरेखीखाली आपली फलंदाजीच्या तंत्रात बदल करण्याचा निर्णय घेतला. कारण त्या तंत्रामुळे पहिल्यापेक्षा चांगला फलंदाज होता येईल आणि अधिक काळापर्यंत खेळपट्टीवर टिकून खेळता येईल. परंतु यादरम्यान मी माझी फलंदाजीची आक्रमकता गमावली.”
तो पुढे म्हणाला की, “मी विचार करत होतो की, भारताकडून कसोटी क्रिकेट खेळण्यासाठी मला आपल्या खेळीत बदल करावा लागेल. मला वाटते की, मी २५ वर्षाच्या चूकीच्या वयात असा करण्याचा प्रयत्न केला.”
टी२० विश्वचषक २००७ (T20 World Cup) असो किंवा २००८ साली ऑस्ट्रेलियामध्ये खेळण्यात आलेली सीबी मालिका (2008 CB Series) असो उथप्पाने दोन्हीदरम्यान भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले होते. तरीही उथप्पाला आपल्या प्रतिभेप्रमाणे चांगली कामगिरी करता आली नाही.
त्याने भारताकडून खेळताना एकूण ४६ वनडे सामाने आणि १३ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले आहेत. त्यात त्याने वनडेत ९३४ धावा आणि टी२० त २४९ धावा केल्या आहेत. त्याला आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत एकही शतक करता आलेले नाही. परंतु त्याने ७ अर्धशतके केली आहेत.
ट्रेंडिंग घडामोडी-
-शेवटची ओव्हर टाकण्यापुर्वी हा खेळाडू घेतो बजरंग बलीचे नाव
-अर्जून तेंडूलकरचे केस कापले थेट मास्टर ब्लास्टरने, खास व्हिडीओ पहा
-रोहित म्हणतो, कॅप्टन कूल धोनी नसता तर ही गोष्ट कधीच नसतो करु शकलो