भारतीय क्रिकेट संघाचा माजी फलंदाज रॉबिन उथप्पाने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये रॉबिन उथप्पाने क्लिनिकल डिप्रेशनशी झालेल्या संघर्षाबद्दल खुलेपणाविषयी सांगितले आहे. उथप्पाने त्याच्या यूट्यूब चॅनेलवर नैराश्याचा त्याच्यावर कसा परिणाम झाला. तसेच, नैराश्याने येणाऱ्या आत्महत्येच्या विचारांवर कशी मात केली? हे सविस्तरपणे सांगितले आहे.
उथप्पाने ग्रॅहम थॉर्प आणि डेव्हिड जॉन्सन या क्रिकेटविश्वातील प्रसिद्ध खेळाडूंची आठवण काढली. ज्यांनी अलीकडेच आत्महत्या केली. इंग्लंडचे माजी क्रिकेटपटू ग्रॅहम थॉर्प यांचे दोन वर्षे नैराश्य आणि चिंताशी सामना केल्यानंतर निधन झाले. तसेच जूनमध्ये, माजी भारतीय क्रिकेटपटू डेव्हिड जॉन्सनचा त्याच्या अपार्टमेंटच्या बाल्कनीतून उडी मारून मृत्यू झाला होता. ज्याला पोलिसांनी आत्महत्या मानले.
या व्हिडिओमध्ये उथप्पा म्हणाला, “मी वैयक्तिकरित्या यातून गेलो आहे. मला माहित आहे की, हा एक चांगला प्रवास नाही. हे आव्हानात्मक असते, ते कमजोर करणारे आणि थकवणारे असते. जेव्हा मी क्लिनिकल डिप्रेशनमधून जात होतो, तेव्हा मला अनेकदा असे वाटायचे की, मी सर्वावर ओझे आहे. माझ्या आजूबाजूच्या लोकांना विसरून गेलो होतो. मी असे जीवन जगत होतो की, माझ्या सर्व इच्छा संपलेल्या आहेत.”
उथप्पाने थॉर्प व डेव्हिड जॉन्सन यांची आठवण काढताना आपल्या संवेदना त्यांच्या कुटुंबासोबत असल्याचे म्हटले. त्यांच्या कुटुंबाला या सर्वातून उभे राहण्याची शक्ती मिळावी, अशी प्रार्थना त्याने केली.
उथप्पाने डिप्रेशन हाताळण्याच्या आणि व्यवस्थापित करण्याच्या पद्धतींवरही चर्चा केली. अशी परिस्थिती निर्माण झाल्यावर, आपले मन खंबीर ठेवावे असे त्याने सुचवले. स्वतःवर विश्वास ठेवून, स्वतःला एक संधी देण्याविषयी नक्कीच विचार करावा. उथप्पाने बऱ्याच वर्ष भारतीय संघातून बाहेर राहिल्यानंतर, 2014 मध्ये भारतीय संघात पुनरागमन केले होते. मात्र, तो संघातील जागा कायम राखण्यात अपयशी ठरलेला. यानंतर 2021 मध्ये त्याने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती.
महत्त्वाच्या बातम्या-
विनेश फोगटची नवी इनिंग! कुस्ती सोडल्यानंतर आता राजकारणाच्या आखाड्यात उतरणार?
“असं वाटतं एकावेळी दोन सामने…” पाकिस्तानच्या स्टार गोलंदाजानं दिली भावनिक प्रतिक्रिया
दिग्गज क्रिकेटर विराट कोहलीसोबत फोटो घेण्यासाठी खूप इच्छुक ‘ही’ महिला खेळाडू