जगातिल सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड अशी बीसीसीआयची ओळख आहे. मागच्या अनेक वर्षांपासून बीसीसीआय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात महत्वाच्या स्थानी आहे. मागच्या जवळपास तीन वर्षांपासून दिग्गज सौरव गांगुली बीसीसीआयच्या अध्यक्षपदाची जबाबादारी चोख पार पाडत आले आहेत. आता पुढच्या काही दिवसांमध्ये रॉजर बिन्नी बीसीसीआयचे नवे अध्यक्ष बनणार असल्याचेही सांगितले जात आहे. अशात भारतीय संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्रींनी बिन्नी अध्यक्ष बनणार असल्यामुळे आनंद व्यक्त केला .
सौरव गांगुली (Sourav Ganguly) भारतीय संघाचे माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज राहिले आहेत. त्यांनी बीसीसीआय अध्यक्षाच्या रूपातही चांगली कामगिरी केली आहे. दुसरीकडे बीसीसीआयच्या नव्या अध्यक्षांच्या रूपात चर्चेत असलेले रॉजर बिन्नी (Roger Binny) भारताला पहिला विश्वचषक जिंकवून देणाऱ्या संघाचा भाग राहिले आहेत. रवी शास्त्री आणि बिन्नी यांचे जुने संबंध आहेत. रवी शास्त्री (Ravi Shashtri) देखील भारताच्या विश्वविजेत्या संघाचाच एक भाग होते, पण अंतिम सामन्यात त्यांना खेळण्यांची संधी मात्र मिळाली नव्हती. आता शास्त्रींती त्यांचे कौतुकही केले आहे. शास्त्रींनी सांगितल्याप्रमाणे बिन्नी जर बीसीसीआयचे अध्यक्ष झाले, तर एका खास विक्रमाची नोंदही होणार आहे.
शास्त्री बोलताना म्हणाले की, “मी खूप खुश आहे, कारण पहिल्यांदाचा भारतीय क्रिकेटच्या इतिसाहात विश्वचषक विजेता खेळाडू बीसीसीआयचा अध्यक्ष बनणार आहे. त्यांच्या गुणवत्तेविषयी काहीच शंका नाहीये. तुम्ही त्यांचे चरित्र आणि इमानदारी पाहिली, तर त्यांच्यावर कोणीच प्रश्न उपस्थित करू शकत नाही. त्याने भारतासाठी विश्वचषक जिंकला आहे आणि बीसीसीआय अध्यक्ष बनण्यासाठी जी प्रतिभा पाहिजे, ती त्यांच्याकडे आहे. ते स्वतः एक क्रिकेटपटू असल्यामुळे याची खात्री करतील की, सर्व गोष्टी क्रिकटपटूंच्या हितासाठी घडतील. देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्यांना खासकरून लक्ष द्यावे लागेल. देशांतर्गत क्रिकेटवर आधीच खूप काम केले गेले आहे, पण आता अजून काम करावे लागणार आहे.”
दरम्यान, माध्यमांतील वृत्तानुसार बीसीसीआयच्या अध्यक्षपदासाठी अनअधिकृत कारवाई पूर्ण झाली आहे. यावेळी रॉजर बिन्नीच्या नाव अध्यक्षपदासाठी निश्चित झाले असून गांगुलींना हे पद खाली करावे लागणार आहे. असेही सांगितले जात आहे की, गांगुली हे पद अध्यक्षपद सोडण्यासाठी तयार नव्हते, पण त्यांच्याकडे अता दुसरा पर्यायही नाहीये. माहितीनुसार बोर्डाने त्यांना आयपीएलच्या अध्यक्षपदाचा प्रस्ताव दिला होता, पण त्यांनी तो नाकारला.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
‘टी20 विश्वचषकानंतर तुम्ही निवृत्ती घ्या’, भारतीय दिग्गजाचा विराट अन् रोहितला सल्ला
जयस्वालचा षटकार थेट स्टेडिअमच्या बाहेर, गोलंदाजही पाहतच राहिला; पठ्ठ्याने स्वत:च शेअर केला व्हिडिओ