युएस ओपन: दिग्गज टेनिसपटू रॉजर फेडररला पराभवाचा धक्का

27ऑगस्टपासून सुरू झालेल्या युएस ओपनमध्ये सोमवारी (3 सप्टेंबर) पाच वेळेचा चॅम्पियन रॉजर फेडररला पराभवाचा धक्का बसला. एटीपी क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या फेडररला 55व्या क्रमांकावर असणाऱ्या जॉन मिलमॅनने चार सेटमध्ये 3-6, 7-5, 7-6(7), 7-6(3) असे पराभूत केले.

फेडररला या सामन्यात पहिल्या सेटनंतरच्या तीन सेटमध्ये साजेशी कामगिरी करता आली नाही. यावेळी त्याने अनेक चुका केल्या. फेडरर पहिल्या सेटमध्ये आघाडीवर असताना मिलमॅनने त्याचा चांगला प्रतिकार केला.

यासामन्यात फेडररने 77 तर मिलमॅनने 28 अनफोर्स्ड एरर (स्वत:हच्या चुकीने प्रतिस्पर्धी खेळाडूला गुण मिळणे) केले. हा सामना 3 तास 34 मिनिटे चालला.

युएस ओपनच्या इतिहासात फेडरर प्रथमच पहिल्या पन्नासपेक्षा सर्वाधिक क्रमवारी असणाऱ्या खेळाडूकडून पराजित झाला आहे. तर पहिला सेट जिंकून नंतर सामन्यात पराभूत होणे हे फेडररच्या बाबतीत दोनदा झाले आहे. तो 2013च्या विम्बल्डनमध्ये सर्जिय स्ताखोवस्कीकडून तो असा पराभूत झाला होता.

फेब्रुवारी महिन्यात मिलमॅनच्या खांद्याची शस्त्रक्रिया झाली आहे. तसेच त्याने ही स्पर्धा सुरू होण्यापूर्वी अॅंडी मरेशी सराव केला आहे.

जॉनने याआधी कधीही एटीपी क्रमवारीत पहिल्या दहामध्ये असणाऱ्या खेळाडूला पराभूत केले नाही . 29 वर्षीय, ऑस्ट्रेलियाच्या या टेनिसपटूचा उपांत्यपूर्व सामना 10 सप्टेंबरला दोन वेळेचा विजेता नोवाक जोकोविचशी होणार आहे.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

विंडिजच्या भारत दौऱ्याचे वेळापत्रक घोषित; पुणे-मुंबईत होणार वनडे सामने

टॉप 5: अॅलिस्टर कूकच्या नावावर आहेत हे खास विक्रम

फिफा २०१८च्या ‘मेन्स बेस्ट प्लेयर’ अवॉर्डमध्ये मेस्सीचे नाव नाही!

You might also like