१८ वेळचा ग्रँडस्लॅम विजेता रॉजर फेडरर विम्बल्डन २०१७च्या अंतिम फेरीत पोहचला आहे. त्याने ११व्या मानांकित टोमास बर्डिचचा ७-६, ७-६,६-४ असा सरळ सेटमध्ये पराभव केला.
७ वेळा विम्बल्डन विजेता असणाऱ्या फेडररला स्पर्धेत तिसरं मानांकन आहे. फेडरर बर्डिच हा सामना २ तास २८ मिनिटे चालला. पहिल्या सेटपाठोपाठ रॉजर फेडररने दुसरा सेटही ट्रायब्रेकरमध्ये जिंकला. पहिला सेट ७-६ असा जिंकल्यानंतर दुसऱ्या सेटमध्ये टोमास बर्डिचला जास्त संधी न देता फेडररने हा सेट ७-६ असा जिंकला.
१-१, २-२, ३-३, ४-४, ५-५, ६-६ असा सुरु असलेला दुसऱ्या सेटमध्ये शेवटपर्यंत दोनही खेळाडूंना सर्विस खंडित करता न आल्यामुळे हा सेटही पहिल्या सेटप्रमाणे ट्रायब्रेकरमध्ये गेला.
तिसऱ्या सेटमध्ये मात्र फेडररने बर्डिचची सर्विस भेदत ६-४ असा सेट जिंकून अंतिम फेरीत प्रवेश केला.
ही फेडररची २९वी अंतिम फेरी असून हा एक विश्वविक्रम आहे.
The final awaits.@rogerfederer beats Tomas Berdych 7-6, 7-6, 6-4 to move within one win of a record eighth men's singles title#Wimbledon pic.twitter.com/EeyG5yzO5T
— Wimbledon (@Wimbledon) July 14, 2017