Australian Open: भारतीय टेनिस स्टार रोहन बोपन्ना याने इतिहास रचला आहे. वास्तविक, रोहन बोपण्णा आणि मॅट एबडेन ऑस्ट्रेलियन ओपनच्या उपांत्य फेरीत पोहोचले आहेत. 44 वर्षीय रोहन बोपण्णा आणि मॅट एबडेन यांनी उपांत्यपूर्व फेरीचा सामना 6-4, 7-6 (7-5) असा जिंकून उपांत्य फेरीत प्रवेश केला. त्याचवेळी, या विजयानंतर रोहन बोपण्णा आणि मॅट एबडेन हे पुरुष दुहेरीत जागतिक क्रमवारीत नंबर-1 बनले आहेत.
ऑस्ट्रेलियन ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीत अर्जेंटिनाच्या मॅक्सिमो गोन्झालेझ ( Maximo Gonzalez) आणि आंद्रेस मोल्टेनी (Andres Molteni) यांचा सामना रोहन बोपण्णा (Rohan Bopanna) आणि मॅट एबडेन (Matt Ebden) यांच्याशी झाला. मात्र रोहन बोपण्णा आणि मॅट एबडेन यांनी विरोधी खेळाडूंना संधी दिली नाही. मॅक्सिमो गोन्झालेझ आणि आंद्रेस मोल्टेनी यांचा 6-4, 7-6 (7-5) असा पराभव झाला. अशा प्रकारे रोहन बोपण्णा आणि मॅट एबडेन ऑस्ट्रेलियन ओपनच्या उपांत्य फेरीत पोहोचले आहेत. तसेच रोहन बोपण्णा आणि मॅट एबडेन हे पुरुष दुहेरीत जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी पोहोचले आहेत. (rohan bopanna and matt ebden move to the semi finals of australian open becomes world no 1)
#AusOpen MD
2nd seeds 🇮🇳Rohan Bopanna & 🇦🇺Matt Ebden Moves to the SF of a grand slam for the 3rd consecutive time!
& it’s 4th SF appearance for Bopanna in his last 5 Slams 😳😱 (except last year French open)
Man at the age of 43!!!! 🤯Since Ram-Salisbury already out 😎👻 pic.twitter.com/qA7ZLq2tNk
— Jackson Dass Antony (@AJacksonDass) January 24, 2024
याआधी रोहन बोपण्णा आणि त्याचा जोडीदार ऑस्ट्रेलियाचा मॅट एबडेन यांनी नेदरलँडच्या वेस्ली कूलहॉफ आणि क्रोएशियाच्या निकोला मेक्टिक या जोडीचा सरळ सेटमध्ये पराभव केला होता. भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या सीडेड जोडीने कूलहॉफ आणि मेक्टिक या माजी जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकाच्या जोडीवर 7-6, 7-6 असा विजय नोंदवला. आता उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात रोहन बोपण्णा आणि मॅट एबडेन यांनी अर्जेंटिनाच्या मॅक्सिमो गोन्झालेझ आणि आंद्रेस मोल्टेनी यांचा 6-4, 7-6 (7-5) असा पराभव केला आहे. (Rohan Bopanna makes history storms into Australian Open semifinals Became number-1 in the world ranking)
हेही वाचा
IND vs ENG: इंग्लंड संघाला मोठा धक्का, पाकिस्तानी वंशाचा बशीर मोठ्या कारणामुळे पहिल्या कसोटीतून बाहेर
श्रेयस अय्यर-यशस्वी जयस्वालसह ‘या’ खेळाडूंनी जिंकला ‘बेस्ट इंटरनॅशनल डेब्यू मॅन’ पुरस्कार, पाहा यादी