चीनमधील हॅंगझू येथे सुरू असलेल्या एशियन गेम्स स्पर्धेत शनिवारी (30 सप्टेंबर) भारतीय संघाच्या खात्यात आणखी एक सुवर्णपदक जमा झाले. भारताचा अनुभवी टेनिसपटू रोहन बोपन्ना व महिला टेनिसपटू ऋतुजा भोसले यांनी मिश्र दुहेरीच्या अंतिम सामन्यात विजय मिळवला. भारतीय संघाचे हे स्पर्धेतील नववे सुवर्णपदक आहे.
काही दिवसांपूर्वीच अमेरिकन ओपनच्या अंतिम फेरीत पराभूत झालेल्या 43 वर्षीय रोहन याने उत्कृष्ट कामगिरी करत यावेळी मिश्र दुहेरीच्या अंतिम फेरीत धडक मारली होती. महाराष्ट्राची आघाडीचे टेनिसपटू ऋतुजा भोसले ही त्याची साथीदार आहे.
अंतिम सामन्यात या जोडीचा सामना चायनीज तैपईच्या जोडीशी झाला. पहिल्या सेटमध्ये भारतीय जोडी 2-6 अशी पराभूत झालेली. मात्र, त्यानंतर जोरदार पुनरागमन करत बोपन्ना व ऋतुजा यांनी 6-4 व 10-4 असा विजय मिळवला. या विजयासह भारतीय संघ पदकतालिकेत पहिल्या पाचमध्ये कायम आहे.
(Rohan Bopanna And Rutuja Bhosale Won Gold In Mixed Doubles Tennis In Asian Games)
हेही वाचा-
रोहितच्या विस्फोटक फलंदाजीची ऑस्ट्रेलियन गोलंदाजाच्या मनात दहशत, म्हणाला, ‘तो तुमच्याविरुद्ध 20-24…’
विश्वचषकाच्या 5 दिवसांआधी युवराजची मोठी भविष्यवाणी! ‘हे’ संघ खेळणार सेमीफायनल, एक नाव हैराण करणारे