---Advertisement---

रोहितच्या विस्फोटक फलंदाजीची ऑस्ट्रेलियन गोलंदाजाच्या मनात दहशत, म्हणाला, ‘तो तुमच्याविरुद्ध 20-24…’

On: शनिवार, सप्टेंबर 30, 2023 12:38 PM
Rohit-Sharma
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळत असलेला रोहित शर्मा सध्या सर्वत्र चर्चेत आहे. रोहित शर्मा वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेत पहिल्यांदाच कर्णधार म्हणून उतरणार आहे. यापूर्वी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात 3 सामन्यांची मालिका पार पडली. त्यातील तिसऱ्या सामन्यात रोहितने विस्फोटक फलंदाजी केली. आता त्याच्या फलंदाजीविषयी ऑस्ट्रेलियाचा स्टार वेगवान गोलंदाज झाय रिचर्डसन याने मोठी प्रतिक्रिया दिली आहे.

झाय रिचर्डसन (Jhye Richardson) याने रोहित शर्मा (Rohit Sharma) याचे कौतुक करत सांगितले की, तो किती खतरनाक फलंदाज आहे. त्याच्या मते, जर तुम्ही रोहितविरुद्ध निर्धाव षटक टाकाल, तेव्हाही आनंद व्यक्त केला जाऊ शकत नाही. कारण, तो पुढच्याच षटकात सहजरीत्या कव्हर करू शकतो. यावरून अंदाज लावला जाऊ शकतो की, रोहित किती विस्फोटक फलंदाज आहे.

काय म्हणाला गोलंदाज?
झाय रिचर्डसन याच्या मते, रोहित शर्मा फक्त एकाच षटकात डाव पालटण्यात पटाईत आहे. माध्यमांशी बोलताना त्याने म्हटले, “रोहित शर्माला निर्धाव षटक टाकल्यानंतर तुम्ही विचार करल की, तुम्ही खूप चांगली गोलंदाजी केली आहे. मात्र, पुढच्याच षटकात तुम्ही याल, तेव्हा तो तुमच्याविरुद्ध 20-24 धावा काढेल.”

रोहितची फटकेबाजी
तिसऱ्या वनडे सामन्यात रोहित शर्मा याने 57 चेंडूंचा सामना करत सर्वाधिक 81 धावांचा पाऊस पाडला. त्याच्या या खेळीत 5 चौकार आणि 6 षटकारांचा समावेश होता. यावरून समजते की, रोहित खूपच चांगल्या फॉर्ममध्ये आहे.

रोहित शर्माबद्दल बोलायचं झालं, तर तो सध्या मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये जगातील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक आहे. त्याच्या नावावर वनडेत 3 द्विशतकांची नोंद आहे. तसेच, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांच्या बाबतीत रोहित दुसऱ्या स्थानी आहे. त्याने आतापर्यंत 451 सामन्यात 551 षटकारांची बरसात केली आहे. तसेच, या यादीत पहिल्या स्थानी वेस्ट इंडिजचा दिग्गज ख्रिस गेल आहे. त्याने 483 सामन्यात 553 षटकार खेचले आहेत. रोहितला हा विक्रम मोडण्यासाठी फक्त 3 षटकारांची गरज आहे. (australia fast bowler jhye richardson big statement on rohit sharma batting)

हेही वाचा-
विश्वचषकाच्या 5 दिवसांआधी युवराजची मोठी भविष्यवाणी! ‘हे’ संघ खेळणार सेमीफायनल, एक नाव हैराण करणारे
वर्ल्डकपसाठी समालोचकांची मांदीयाळी, दिग्गज क्रिकेटपटू पसरवणार आपल्या आवाजाची जादू; पाहा यादी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---