पाकितानचा कर्णधार बाबर आझम सध्या जगातील सर्वोत्तम फलंदाजांमध्ये गणला जातो. मात्र, गेल्या काही काळापासून बचावात्मक फलंदाजीमुळे टीकेला बळी पडत आहे. भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू व समालोचक रोहन गावसकर यांनी त्याच्या अशा फलंदाजीवर खरमरीत टीका केली आहे.
आशिया चषकातील खराब कामगिरीनंतर बाबर इंग्लंडविरुद्ध पुन्हा एकदा शानदार फलंदाजी करताना दिसला. त्याने शतकही झळकावले. मात्र, तरीदेखील त्याच्या स्ट्राईकरेटची चर्चा होतच आहे. याच मुद्द्याला धरून रोहन गावसकर एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले,
“त्याला एकाच प्रकारे साचेबद्धपणे खेळ करणारा खेळाडू म्हणणे थोडे चुकीचे ठरेल. तो दर्जेदार खेळाडू आहे. आकडे पाहिले तर सर्व गोष्टी आपण समजून जाऊ. वस्तुस्थिती अशी आहे की, त्याला धावांचा वेग कधी वाढवायचा हे माहित आहे. तुम्ही पहिल्या आणि दुसऱ्या डावातील त्याचे आकडे बघा. त्याचा स्ट्राईक रेट पहिल्या डावात 125 आणि दुसऱ्या डावात 137 आहे.”
गावसकर पुढे बोलताना म्हणाले,
“बाबरच्या हळू खेळण्यावर अनेकदा टीका होते. त्याची मानसिकता तशी झाली असेल. मला वाटते कदाचित त्याला अपयशाची भीती वाटत असावी. कारण त्याला असे अनेकदा वाटत असेल की पाकिस्तान संघाची संपूर्ण फलंदाजी त्याच्यावर अवलंबून आहे. त्यामुळे तो आपल्या बाद होण्यावर किंमत लावतो. कदाचित तो बाद झाल्यास संपूर्ण फलंदाजी क्रम ढासळू शकतो.”
बाबर आझम मागील महिन्यात झालेल्या आशिया चषकात पूर्णपणे अपयशी ठरलेला. त्यानंतर मात्र इंग्लंड विरुद्ध त्याने पुनरागमन करत, दोन अर्धशतके व एक शतक साजरे केले. आगामी विश्वचषकात त्याच्याकडून पाकिस्तान संघाला पुन्हा एकदा अपेक्षा आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
T20 Word Cup 2022: स्पर्धेच्या काही दिवसांआधीच भारत ब्रिसबेनमध्ये ठोकणार तळ! जाणून घ्या कारण
ब्रेकिंग! जसप्रीत बुमराहच्याजागी भारताच्या टी20 संघात ‘या’ वेगवान गोलंदाजाची एंट्री