---Advertisement---

‘तेव्हा टीम इंडियामध्ये अन् आता विम्बल्डनमध्ये घेतली माझी जागा’, कार्तिकच्या ‘त्या’ फोटोवर रोहन गावसकरची कमेंट

On: रविवार, जुलै 11, 2021 1:21 AM
---Advertisement---

लंडनमध्ये २८ जूनपासून ते ११ जुलैपर्यंत विम्बल्डनचा थरार रंगला आहे. या स्पर्धेसाठी विविध क्षेत्रातील दिग्गजांनी उपस्थिती दर्शवली आहे. भारताचे अनेक क्रिकेटपटूही सध्या इंग्लंडमध्ये असल्याने काहींनी विम्बल्डनमध्ये टेनिस सामने पाहाण्याची मजा घेतली. यामध्ये भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर आणि दिनेश कार्तिकचाही समावेश आहे. कार्तिकने गावसकरांबरोबर विम्बल्डन स्पर्धेतील सामने पाहाण्यासाठी गेला असतानाचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे, ज्यावर रोहन गावसकरने मजेशीर कमेंट केली आहे.

कार्तिकने नुकतेच समालोचन क्षेत्रात पाऊल ठेवले आहे. त्याने काही दिवसांपूर्वीच आयसीसीच्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यादरम्यान समालोचन केले होते. यावेळी त्याच्यासह समालोचन टीममध्ये सुनील गावसकर देखील होते. त्यामुळे सध्या कार्तिक आणि सुनील गावसकर हे दोघेही इंग्लंडमध्ये असून त्यांनी विम्बल्डनचे सामने पाहाण्याही मजा घेतली. कार्तिकने विम्बल्डन पाहायला गेल्यानंतरचा ऑल इंग्लंड क्लबमधील सुनील गावसररांबरोबरचा फोटो शेअर केला.

यावर सुनील गावसकर यांचा मुलगा रोहन गावसकर याने कमेंट केली की ‘जेव्हा दिनेश कार्तिकने भारतीय संघाकडून पदार्पण केले होते, तेव्हा इंग्लंडविरुद्ध अंतिम ११ जणांच्या संघात माझी जागा घेतली होती आणि आता विम्बल्डनमध्ये देखील त्याने माझी जागा घेतली आहे. आशा आहे की तुम्ही स्ट्रॉबेरी आणि क्रिमचा आनंद घेतला असेल.’

रोहनने केले आहे भारतीय संघाचे प्रतिनिधित्व
आपल्या वडीलांच्या पावलावर पाऊल टाकत रोहन गावसकरनेही क्रिकेटमध्येच आपली कारकिर्द घडवण्याचे ठरवले होते. त्याने २००४ साली भारताकडून ऑस्ट्रेलियाविरुद्ध ब्रिस्बेन येथे वनडे सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पणही केले होते. पण त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपली कारकिर्दी मोठी करता आली नाही. त्याने केवळ ११ वनडे सामने खेळले. या ११ वनडेत रोहनने १८.८७ च्या सरासरीने १५१ धावा केल्या.

तसेच २००४ साली जेव्हा भारताने इंग्लंड दौरा केला होता, तेव्हा लॉर्ड्सला झालेल्या वनडे सामन्यात दिनेश कार्तिकला रोहन ऐवजी अंतिम ११ जणांच्या संघात संधी देण्यात आली होती.

रोहनने त्याच्या कारकिर्दीत ११७ प्रथम श्रेणी सामने खेळताना ४४.१९ च्या सरासरीने ६९३८ धावा केल्या होत्या. तसेच त्याने १२६ अ दर्जाचे सामने खेळले आहेत. त्या सामन्यांमध्ये त्याृनी ३०.९५ च्या सरासरीने ३१५७ धावा केल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या – 

भारताच्या ‘या’ क्रिकेटपटूने अफलातून कॅचबद्दल कौतुक करताच हरलीन देओल म्हणाली, ‘तुझ्याकडूनच मिळाली प्रेरणा’

‘त्यावेळी मी झहीरला शिव्या दिल्या की मला सलामीवीर बनवलं, पण आज…’, सेहवागने केला खुलासा

इंग्लंड-भारत मालिकेच्या पहिल्या सामन्यातून आणखी एक क्रिकेटपटू बाहेर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---