लंडनमधील ओव्हल येथे खेळल्या गेलेल्या इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात कर्णधार रोहित शर्माने नाबाद ७६ धावांची खेळी करून भारताला १० गडी राखून मोठा विजय तर मिळवून दिलाच शिवाय अनेक विक्रमही रचले. रोहितने ७६ धावांच्या खेळीत ६ चौकार आणि ५ षटकार मारले. यासोबतच रोहितने वनडेमध्ये २५० षटकार पूर्ण करण्याचा मोठा विक्रमही केला. एकदिवसीय क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा रोहित हा भारताचा पहिला फलंदाज ठरला आहे. एवढेच नाही तर ५० षटकांच्या फॉरमॅटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा चौथा फलंदाजही रोहित आहे. या बाबतीत पाकिस्तानचा शाहिद आफ्रिदी पहिल्या क्रमांकावर तर ख्रिस गेल दुसऱ्या क्रमांकावर आहे.
एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक षटकार:-
३५१ – शाहिद आफ्रिदी
३३१ – ख्रिस गेल
२७० – सनथ जयसूर्या
२५० – रोहित शर्मा
२२९ – एमएस धोनी
रोहितची बॅटमधून ७६ धावांची खेळी ही सेना (दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, इंग्लंड) देशांमधील त्याची २८ वी अर्धशतकी खेळी आहे. माजी भारतीय कर्णधार विराट कोहली, सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड यांच्यानंतर सेना देशांमध्ये सर्वाधिक वेळा ही कामगिरी करणारा रोहित हा चौथा भारतीय फलंदाज आहे.
एकदिवसीय सामन्यात सेना देशांमध्ये भारतीयांनी सर्वाधिक केलेल्या अर्धशतकी खेळी
३८ – विराट कोहली
३४ – सचिन तेंडुलकर
३२ – राहुल द्रविड
२८ – रोहित शर्मा
२४ – एमएस धोनी
या खेळीमुळे रोहित शर्मा इंग्लंडमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाजही ठरला आहे. न्यूझीलंडच्या केन विल्यमसनला मागे टाकत त्याने ही कामगिरी केली. भारताचा विराट कोहली इंग्लंडमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे.
इंग्लंडमध्ये भेट देणाऱ्या खेळाडूंनी सर्वाधिक एकदिवसीय धावा:
१४११ – रोहित शर्मा
१३९३ – केन विल्यमसन
१३८७ – रिकी पाँटिंग
१३४५ – व्हिव्ह रिचर्ड्स
१३१६ – विराट कोहली
या सामन्यात शिखर धवनने रोहित शर्माला चांगली साथ देत भारताला विजय मिळवून दिला आणि पहिल्या विकेटसाठी ११४ धावांची भागीदारी केली. या भागीदारीमुळे धवन आणि रोहित ही जोडी एकदिवसीय क्रिकेटमध्ये ५००० धावा पूर्ण करणारी भारतातील दुसरी आणि जगातील चौथी सलामी जोडी ठरली. या बाबतीत सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली ही जोडी अव्वल स्थानावर आहे, ज्यांच्या नावावर सलामी जोडी म्हणून एकदिवसीय क्रिकेटमध्ये ६६०९ धावा आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
इंग्लंडचा धुव्वा उडवत रोहित-शिखरने गाठलं आकाश, सचिन-गांगुलीच्या विश्वविक्रमापासून फक्त एक पाऊल दूर
रोहितच्या खणखणीत षटकाराने चिमुकली जखमी, मग झाले असे काही जे जिंकेल तुमचे हृदय!
इंग्लंडमध्ये यादवचा जलवा! फेकला असा चेंडू की हवेत उडाल्या स्टंप्स; पाहा काउंटीतील पहिली विकेट