शुक्रवारी (२४ सप्टेंबर) आयपीएल स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात ३५ वा सामना पार पडला. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि चेन्नई सुपर किंग्स हे संघ आमने सामने होते. या रोमांचक सामन्यात चेन्नई सुपर किंग्स संघाने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाला ६ गडी राखून पराभूत केले. दरम्यान या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान न मिळालेल्या रॉबिन उथप्पाने मन जिंकणारे कृत्य केले, ज्याचे फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेत झालेल्या खेळाडूंच्या लिलावात रॉबिन उथप्पाला चेन्नई सुपर किंग्स संघात स्थान देण्यात आले आहे. त्याने यापूर्वी कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स संघासाठी अप्रतिम कामगिरी केली होती. परंतु चेन्नई सुपर किंग्स संघातील फलंदाज चांगली कामगिरी करत असल्यामुळे त्याला अजूनपर्यंत प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळाले नाहीये. दरम्यान तो सामन्यात खेळला नसला तरी देखील सामना झाल्यानंतर सोशल मीडियावर त्याची चर्चा रंगली आहे.
तर झाले असे की, सामना झाल्यानंतर जेव्हा चेन्नई सुपर किंग्स संघातील फलंदाज सुरेश रैना आणि एमएस धोनी पॅव्हेलियनच्या दिशेने येत होते. त्यावेळी आयपीएल स्पर्धेतील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक फलंदाज रॉबिन उथप्पाने या खेळाडूंजवळ जाऊन स्वत: त्यांच्याकडून बॅट आणि हेल्मेट घेतले. उथप्पाने केलेले हे कृत्य पाहून, चाहते देखील भलतेच खुश झाले आहेत.
सामन्याचा विजयी शेवट केल्यानंतर धोनी आणि रैना थकले असतील, याची जाणीव उथप्पाला झाली. सामन्यानंतर संघातील इतर शिलेदार या जोडीच्या प्रदर्शनाचे कौतुक करताना दिसले. पण एकटच्या उथप्पाने त्यांच्या मनातील गोष्ट ओखळली आणि त्यांची बॅट व हेल्मेट घेत त्यांच्या हातातील ओझं हलकं केले. त्याचे हे कृत्य खरोखरच कौतुकास्पद होते.
तसेच डगआऊटमध्ये बसून देखील रॉबिन उथप्पा खेळाडूंचा उत्साह वाढवत असतो. त्याच्या चाहत्यांना अशी आशा आहे की, लवकरच तो प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळताना दिसून येऊ शकतो.
#CSK #IPL2021 #MSDhoni pic.twitter.com/4wU6tHjg0i
— Prabhat Sharma (@PrabS619) September 25, 2021
या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाकडून देवदत्त पडीक्कलने सर्वाधिक ७० तर विराट कोहलीने ५३ धावांची खेळी केली होती. या खेळीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाला २० षटक अखेर ६ बाद १५६ धावा करण्यात यश आले होते. या धावांचा पाठलाग करताना, चेन्नई सुपर किंग्स संघाकडून ऋतुराज गायकवाडने सर्वाधिक ३८ तर अंबाती रायुडूने ३२ धावांचे योगदान दिले. हा सामना चेन्नई सुपर किंग्स संघाने ६ गडी राखून आपल्या नावावर केला.
महत्त्वाच्या बातम्या-
षटकार सोडा, साधा चौकारही नाही; राजस्थानची पावरप्लेमध्ये इतिहासातील दुसरी सर्वात ‘वाईट’ कामगिरी
बुढ्ढे में है दम! वयाच्या ४२ व्या वर्षीही ख्रिस गेलने रचला इतिहास, मोडला द्रविडचा अनोखा विक्रम
अखेर भारत-इंग्लंड कसोटी मालिकेचा लागणार सोक्षमोक्ष, रद्द अंतिम सामन्याचा ‘या’वेळी लागणार मुहूर्त?