दुबई। 14 व्या एशिया कप स्पर्धेत रविवारी, 23 सप्टेंबरला पार पडलेल्या भारत विरुद्ध पाकिस्तान संघातील सुपर फोरच्या सामन्यात भारताने 9 विकेट्सने विजय मिळवला. भारताच्या या विजयात सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा आणि शिखर धवनने शतके करत मोलाचा वाटा उचलला.
या सामन्यानंतर भारताचे प्रशिक्षक रवी शास्त्रींनी रोहित आणि शिखरची मुलाखत घेतली. या मुलाखतीचा व्हिडिओ बीसीसीआयने त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर शेअर केला आहे.
या शास्त्रीबरोबरच्या गप्पांदरम्यान रोहित आणि शिखरने फलंदाजी करतानाचे अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. फलंदाजी करताना एकमेकांना ते कसे साथ देतात याबद्दल सांगताना रोहित म्हणाला, “पहिले 5 षटके तो (शिखर) क्रिकेटबद्दल बोलतो. पण त्यानंतर आम्ही वेगळ्या गोष्टी बोलतो.”
“पहिल्या 6 षटकात आम्ही आपल्याला काय करण्याची गरज आहे आणि एकेरी धाव आपण कसे घेऊ शकतो, तसेच कोणते क्षेत्ररक्षक संघर्ष करत आहे हे सर्व पाहुन ठरवतो. एकदा आम्ही 6 किंवा 7 षटके खेळल्यानंतर शिखरला एकटे सोडणेच योग्य असते.”
धवनसाठी रविवारी केलेली खेळी आणि रोहितबरोबर केलेली द्विशतकी भागीदारी ही अविस्मरणीय ठरली आहे. या बद्दल धवन म्हणाला, “चांगल्या आक्रमणासमोर चांगली खेळी करणे चांगलेच असते आणि तुम्हाला त्यांच्या विरुद्ध चांगल्या धावा केल्यावर समाधान वाटते.”
“आमच्यासाठी हे क्षण खूप अभिमानास्पद आहेत. जेव्हा मी वयस्कर होईल, तेव्हा मी माझ्या मुलाला सांगेल की मी पाकिस्तान विरुद्ध शतक केले. जेव्हाही तुम्ही पाकिस्तानविरुद्ध खेळता तेव्हा तो खुप खास क्षण असतो.”
फलंदाजीला जाताना काय विचार केला होता याद्दल धवन म्हणाला, “जेव्हा आम्ही फलंदाजीला जात होतो तेव्हा आम्हाला माहित होते की पाकिस्तानकडे चांगले वेगवान गोलंदाज आहेत. तसेच आम्हाला माहित होते की जर आम्ही 10 ते 15 षटके टिकून राहिलो आणि आम्ही स्थिर झालो की आम्ही एकमेकांच्या साथीची मजा घेतो.”
“त्यामुळे जर रोहित आक्रमक झाला तर मी सावध खेळ करतो. खुप सामन्यात एकत्र खेळल्यानंतर आम्हाला एकमेकांना जास्त काही सांगण्याची गरज नसते.”
Ravi Shastri presents the Hitman & Gabbar Show.
What happens when coach @RaviShastriOfc turns presenter and does a rendezvous with captain @ImRo45 & @SDhawan25 ? You wouldn't want to miss this – by @28anand
📹📹https://t.co/M8N2oSkwhN pic.twitter.com/gkP4PaKDQJ
— BCCI (@BCCI) September 24, 2018
या सामन्यात रोहितने 119 चेंडूत 111 धावांची नाबाद शतकी खेळी केली. या खेळीत त्याने 7 चौकार आणि 4 षटकार मारले.तसेच शिखरने 100 चेंडूत 114 धावा करताना 16 चौकार आणि 2 षटकार मारले. तर दोघांनी मिळून पहिल्या विकेटसाठी 210 धावांची भागीदारीही रचली.
महत्वाच्या बातम्या –
–कर्णधारपद रोहित शर्मासाठी ठरतयं फलदायी
–दुबईच्या या मैदानावर रोहित शर्मा ठरला बादशाह
–तेंडुलकर-सेहवाग जोडीपेक्षा रोहित-शिखरची जोडी ठरली बेस्ट