2024 टी20 विश्वचषकापूर्वी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा तणाव थोडा वाढू शकतो. कारण टू20 विश्वचषकापूर्वी भारतीय संघाकडे आता फक्त तीन टी20 सामने आहेत आणि हे तीन सामने या महिन्यात अफगाणिस्तानविरुद्ध होणार आहेत. येथे निवडकर्ते विश्वचषकासाठी भारतीय संघाचे योग्य संयोजन ठरवू शकणार नाहीत किंवा जूनमध्ये होणाऱ्या या स्पर्धेसाठी संघात कोणाचा समावेश करायचा हे ते ठरवू शकणार नाहीत. सर्वात मोठी समस्या म्हणजे आता रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनेही या विश्वचषकात खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे. अशा स्थितीत संघ निवड हे बीसीसीआयसाठी सर्वात मोठे आव्हान असणार आहे.
बीसीसीआयच्या एका सूत्राचा हवाला देत पीटीआयने दिलेल्या वृत्तात असे लिहिले आहे की, विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) याने स्पष्ट केले आहे की, त्यांना जूनमध्ये होणाऱ्या टी20 विश्वचषकाचा भाग व्हायचे आहे. अफगाणिस्तान टी20 मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यापूर्वी मुख्य निवडकर्ता अजित आगरकर (Ajit Agarkar) भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड, (Rahul Dravid) कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यासह इतर दोन निवडकर्त्यांशीही चर्चा करतील, असेही अहवालात समोर आले आहे.
मात्र, या सगळ्यात विराट आणि रोहित अफगाणिस्तान मालिकेत सहभागी होणार हे निश्चित नाही. भारतीय संघाला 25 जानेवारीपासून इंग्लंडविरुद्ध 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. अशा स्थितीत भारतीय संघातील वरिष्ठ खेळाडूंना अफगाणिस्तानविरुद्धच्या टी20 मालिकेतून विश्रांती मिळण्याची शक्यता आहे.
पीटीआयच्या रिपोर्टमध्ये असेही समोर आले आहे की, अफगाणिस्तान मालिका भारताच्या टी20 विश्वचषक संघाशी संबंधित सर्व प्रश्नांची उत्तरे देणार नाही. अशा परिस्थितीत, आयपीएल दरम्यान 25 ते 30 खेळाडूंच्या कामगिरीवर विशेष लक्ष असेल आणि त्यांच्यामधून टी20 विश्वचषक संघाची निवड केली जाईल. बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले की, सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पंड्या फिट नाहीत. अशा स्थितीत अफगाणिस्तान मालिकेतून फारसा निष्कर्ष काढता येणार नाही. आयपीएलच्या पहिल्या महिन्यानंतरच सर्व काही ठरवले जाईल. (BCCI in tension! Rohit-Virat want to play T20 World Cup 2024)
हेही वाचा
AUS vs PAK: फेअरवेल कसोटीत वॉर्नर आपल्या मुलींसह उतरला मैदानात; टाळ्यांच्या कडकडाटाने गुंजले स्टेडियम, पाहा व्हिडीओ
IND vs SA: कारकिर्दीतील शेवटचा कसोटी सामना खेळणाऱ्या डीन एल्गरचं लक्षवेधी विधान, म्हणाला, ‘माझ्यासाठी हाच…’