भारत-ऑस्ट्रेलिया (India vs Australia) संघातील बाॅर्डर-गावसकर मालिकेतील पाचवा कसोटी सामना सिडनीच्या मैदानावर रंगला आहे. पण आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे रोहित शर्मा (Rohit Sharma) भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर आहे. दरम्यान रोहितबाबत एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. भारतीय संघाच्या निवडकर्त्यांनी रोहितला स्पष्ट संदेश दिल्याचा दावा एका रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. निवडकर्ते आता रोहितच्या पलीकडे विचार करत आहेत. आगामी काळात तो भारतीय संघाची कमान अन्य कोणत्या तरी खेळाडूकडे सोपवू शकतो. मात्र याला अधिकृत मान्यता मिळणे बाकी आहे.
रोहित सतत खराब फॉर्मशी झुंजत होता. त्यामुळे तो सिडनी कसोटीतून बाहेर पडला. रोहितने स्वतः प्लेइंग इलेव्हनमधून माघार घेण्याचा निर्णय घेतल्याचा दावाही काही रिपोर्ट्समध्ये करण्यात आला होता. पण आता जी बातमी समोर आली आहे ती अधिकच आश्चर्यकारक आहे. कारण इंडियन एक्सप्रेसच्या रिपोर्टनुसार, निवड समितीने रोहितला एक संदेश दिला आहे. आता बॉर्डर-गावसकर मालिकेनंतर भारतीय संघाचे कर्णधारपद दुसऱ्याच्या हाती जाऊ शकते.
रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, रोहित आता निवडकर्त्यांच्या योजनांचा भाग नाही. सिडनी कसोटीपूर्वीच रोहितला हे सर्व सांगितले होते. ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर निवडकर्ते विराट कोहलीसोबत बसून आगामी मालिकेची योजनाही बनवू शकतात. भारतीय संघ आता मोठ्या बदलाच्या काळातून जाणार आहे.
रिपोर्टनुसार, भारत-ऑस्ट्रेलिया संघात सुरू असलेल्या पाचव्या कसोटीच्या आधी रोहित आणि गंभीरची अजित आगरकरसोबत भेट झाली होती. त्यानंतरच रोहितला प्लेइंग इलेव्हनमधून घेण्याचा हटवण्याचा निर्णय घेण्यात आला. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर रोहितची निराशाजनक कामगिरी पाहायला मिळाली. भारताने पहिली कसोटी जिंकली. मात्र त्यानंतर दोन कसोटी सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला.
रोहित शर्माच्या कसोटी आंतरराष्ट्रीय कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले, तर त्याने भारतासाठी 67 कसोटी सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्याने 116 डावात फलंदाजी करताना 40.57च्या सरासरीने फलंदाजी करताना 4,301 धावा केल्या आहेत. कसोटीतील त्याची सर्वोच्च धावसंख्या 212 आहे. दरम्यान त्याने 18 अर्धशतकांसह 12 शतके झळकावली आहेत. तर 1 द्विशतक देखील झळकावले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
5 भारतीय गोलंदाजांनी एका कसोटी मालिकेत सर्वाधिक वेळा केली सलामीवीरांची शिकार
करुण नायरचा अनोखा रेकॉर्ड, लिस्ट ए क्रिकेटमध्ये आऊट न होता केल्या इतक्या धावा
मुंबई इंडियन्सच्या स्टार खेळाडू पाकिस्तानसमोर दाखवला दम, ठोकले झंझावाती शतक