उद्यापासून(24 फेब्रुवारी) भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात पहिला टी20 सामना सुरु होणार आहे. हा सामना विशाखापट्टणम येथे होणार असून भारतीय प्रमाणवेळे नुसार संध्याकाळी 7 वाजता या सामन्याला सुरुवात होणार आहे.
या सामन्यात भारताचा आक्रमक सलामीवीर फलंदाज रोहित शर्माला एक मोठा विश्वविक्रम करण्याची संधी आहे. रोहितने जर या सामन्यात दोन षटकार मारले तर तो आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये सर्वाधिक षटकार मारणारा खेळाडू ठरेल.
याबरोबरच तो सध्या सर्वाधिक षटकार मारण्याच्या यादीत संयुक्तरित्या अव्वल स्थानावर असणाऱ्या ख्रिस गेल आणि मार्टिन गप्टीलला मागे टाकेल.
सध्या रोहित या यादित 102 षटकारांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर गेल आणि गप्टील प्रत्येकी 103 षटकारांसह अव्वल स्थानी आहेत.
रोहित हा आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये सर्वाधिक धावा करणाराही खेळाडू आहे. त्याने हा पराक्रम न्यूझीलंड दौऱ्यातील टी20 मालिकेत खेळताना केला होता. रोहितने आत्तापर्यंत 93 सामन्यात 32.76 च्या सरासरीने 2326 धावा केल्या आहेत. यात त्याने 4 शतके आणि 16 अर्धशतके केली आहेत.
आंतरराष्ट्रीय टी20मध्ये सर्वाधिक षटकार मारणारे खेळाडू-
103 – ख्रिस गेल / मार्टिन गप्टील
102 – रोहित शर्मा
92 – कॉलिन मुनरो
91 – ब्रेंडन मॅक्यूलम
83 – शेन वॉटसन
महत्त्वाच्या बातम्या-
–विश्वचषक जिंकणं टीम कोहलीला या कारणामुळे नक्कीच सोपं नाही
–आयपीएलचे तिकिट मागणाऱ्यावर भारतीय क्रिकेटरची पत्नी भडकली, वाचा
–इशान किशनची कमाल, धोनीला न जमलेला विक्रम केला नावावर