---Advertisement---

क्रिकेटमध्ये पुन्हा पवार पर्व! रोहित पवार महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे नवे अध्यक्ष

Rohit Pawar
---Advertisement---

शनिवारी (8 जानेवारी) पुण्याच्या गहुंजे स्टेडियवर महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनची महत्वाची बैठक पार पाडली. या बैठकीत राष्ट्रवादीचे नेते आणि कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांच्यावर मोठी जबाबदाली सोपवण्यात आली. बैठकतीत सर्वप्रथम रोहित पवार यांना एमसीएच्या 16 सदस्यीय समितीत सामील केले गेले आणि नंतर असोसिएशनचे अध्यक्षपदही सोपवण्यात आले. शरद पवार यांच्यानंतर आता रोहित पवार हे त्यांच्या कुटुंबातील दुसरी सदस्य आहेत, ज्यांची एमसीए अध्यक्षपदी निवड झाली आहे.

रोहित पवार (Rohit Pawar) एक सुप्रसिद्ध उद्योजक असून निवडणुकीच्या रिंगणात देखील त्यांनी चांगलीच फटकेबाजी केल्याचे आपल्याला पाहायला मिळाले आहे. रोहित पवार त्यांचे आजोबा आणि राष्ट्रवादी काँग्रेसची अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यानंतर पवार कुटुंबाचा वारसा पुढे चावताना दिसत आहेत. शरद पवार यांनी 2013 आणि त्याआधीच 2001-02 मध्ये एमसीए अध्यक्षाच्या रूपात कामकाज पाहिले होते. तसेच बीबीसीआय आणि आयसीसी अध्यक्षासारख्या मोठ्या जबाबदाऱ्या देखील शरद पवारांनी पार पाडल्या आहेत. आता रोहित पवार एमसीए अध्यक्षच्या भूमिकेत आगामी काळात दिसणार आहेत. अध्यक्षपदी रोहित वपारांची निवड बिनविरोध झाल्याचे सांगितले गेले आहे. तसेच उद्योगमंत्र उदय सामंत यांचे भाऊ किरन सावंत यांची असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

https://twitter.com/RRPSpeaks/status/1612055389385945090?s=20&t=6sDIl4wg_z1qEjRMy9qEpw

महाराष्ट्राच्या राजकारणात नेहमीच केंद्रबिंदू राहणारे पवार कुटुंब राजकाराणाव्यतिरिक्त इतर श्रेत्रांमध्येही सक्रिय सहभाग घेत आले आहे. क्रिकेटमध्ये या कुटुंबाचे योगदान महत्वाचे राहिले आहे. आता हा वारचा रोहित वरावर पुढे घेऊन जाताना दिसणार आहेत. एमसीएच्या या महत्वाच्या बैठकीत रोहित पवारांनी क्लब गटाकडून सदस्यपदी निवडण्यात आले आणि त्यांनी त्यांनी अध्यक्षपदापर्यंत मजल मारली.

रोहित पवारांकडून एमसीए अध्यक्षांच्या रूपात चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल. कारण त्यांना यापूर्वी नेहमीच क्रिकेटच्या मैदानात खेळातना पाहिले गेले आहे. पवार अनेकदा गाडी थांबवून लहान मुलांसोबत गल्ली क्रिकेट खेळताना पाहायला मिळाले आहेत. अशात आता एमसीए अध्यक्षाच्या रूपात त्यांचे काम पाहण्यासारखे असेल. (Rohit Pawar elected unopposed as President of MCA)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
वनडे विश्वचषक खेळण्याचे रिषभचे स्वप्न भंगणार? ऑपरेशननंतर समोर आली नवी माहिती
शरद पवारांनंतर आता रोहित पवारही क्रिकेटच्या मैदानात, एमसीएमध्ये मिळाली महत्वाची जबाबदारी

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---