---Advertisement---

शर्माजी का बेटा ‘हिट’, शतकासह ‘या’ विक्रमात टाकलं गावसकरांनाही मागे

---Advertisement---

भारत विरुद्ध इंग्लंडच्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्याला आजपासून चेन्नईच्या मैदानावर सुरुवात झाली. पहिला सामना गमावलेल्या भारतीय संघाच्या दृष्टीने हा सामना मालिकेत पुनरागमन करण्यासाठी अतिशय महत्वाचा आहे. या सामन्याच्या पहिल्याच दिवशी सलामीवीर रोहित शर्माने शतक झळकावत भारताला मजबूत सुरुवात करून दिली आहे. यासह भारताकडून सगळ्या प्रकारच्या फॉरमॅटमध्ये सर्वाधिक शतके झळकावणाऱ्या सलामीवीरांच्या यादीत तो तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे.

रोहितने सावरला डाव

चेन्नईच्या मैदानावर नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेल्या भारताची सुरुवात खरंतर फार चांगली झाली नाही. दुसऱ्याच षटकात युवा शुबमन गिल खातेही न उघडता माघारी परतला. त्यांनतर रोहित शर्माने चेतेश्वर पुजारासह ८५ धावांची भागीदारी रचली. मात्र पुजारा आणि  कर्णधार विराट कोहली अवघ्या एका धावेच्या अंतराने माघारी परतले.

त्यामुळे पहिल्याच सत्रात भारतीय संघ बॅकफूटवर पडल्याची चिन्हे होती. मात्र रोहितने आपल्याच शैलीत फटकेबाजी चालू ठेवत भारताचा डाव सावरला. त्याने ४२व्या षटकात मोईन अलीच्या गोलंदाजीवर स्विपचा फटका खेळत आपले शतक पूर्ण केले. रोहितच्या कसोटी कारकिर्दीतील हे सातवे शतक ठरले.

गावसकरांना टाकले मागे

इंग्लंडविरूद्धचे आजचे हे शतक रोहित शर्माच्या कसोटी कारकिर्दीतील सातवे शतक ठरले. मात्र सलामीवीर म्हणून भारताकडून सगळ्या प्रकारच्या फॉरमॅटमध्ये झळकावलेले हे तब्बल ३५वे शतक होते. यासह भारताकडून सगळ्या प्रकारच्या फॉरमॅटमध्ये सलामीवीर म्हणून सर्वाधिक शतके झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला.

त्याने यावेळी माजी दिग्गज सलामीवीर सुनील गावसकर यांना या यादीत मागे टाकले. याआधी गावसकर हे ३४ शतकांसह तिसऱ्या स्थानी होते. या यादीत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर अर्थातच अव्वल स्थानी असून त्याच्या नावावर ४५ शतके आहे. तर माजी स्फोटक सलामीवीर वीरेंद्र सेहवाग दुसऱ्या स्थानी असून त्याच्या नावे ३६ शतके आहे.

भारताकडून सगळ्या प्रकारच्या फॉरमॅटमध्ये सर्वाधिक शतके झळकावणारे सलामीवीर-

१) सचिन तेंडुलकर – ४५                                                                                                                                  २) वीरेंद्र सेहवाग – ३६                                                                                                                                      ३) रोहित शर्मा – ३५*                                                                                                                                          ४) सुनील गावसकर – ३४                                                                                                                                  ५) शिखर धवन – २४

महत्वाच्या बातम्या:

रो-हिट मॅन शो इज ऑन..! इंग्लिश गोलंदाजांना चोप-चोप चोपलं, रोहितचं शानदार शतक; पाहा सेलिब्रेशन

INDvsENG 2nd Test Live: हिटमॅन रोहित शर्माचे धमाकेदार शतक; ४१ ओव्हरनंतर भारताच्या ३ बाद १४४ धावा

मोईन अलीच्या जबरदस्त चेंडूने स्टंप्सचा भुगा, स्वत: विराट कोहलीही अवाक्; पाहा भन्नाट व्हिडिओ

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---