---Advertisement---

रोहित, सचिन व धोनीने ही गोष्ट आयुष्यात कधी केली नाही

On: शनिवार, एप्रिल 11, 2020 3:32 PM
---Advertisement---

क्रिकेट जगतात फीट राहणे किती महत्त्वाचे आहे, हे सर्वांना माहिती आहे. त्यासाठी ट्रेनरही तितक्याच चांगल्या दर्जाचा हवा असतो.  भारताने २०१३मध्ये चँपियन्स ट्रॉफीच्या रुपात आपले शेवटची आयसीसी ट्राॅफी जिंकली होती. त्यावेळी रामजी श्रीनिवासन हे भारतीय संघाचे ट्रेनर होते. यापूर्वी २०११ मध्येही रामजी हे भारतीय संघाचे ट्रेनर होते.

सध्या जगभरात कोरोना व्हायरसचा (Corona Virus) प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत फीट राहण्याचा चांगला सल्ला रामजी (Ramji Srinivasan) यांच्याऐवजी दुसरे कोण देणार?

यावेळी रामजी यांनी सांगितले की, फीट राहणे अधिक कठीण नाही. तसेच फीट राहण्यासाठी अधिक वजन उचलण्याचीही गरज नाही.

सध्याच्या युगात फीट राहण्यासाठी झालेले बदल पाहून रामजीदेखील आश्चर्यचकीत झाले आहेत. यावेळी ते म्हणाले की, “विश्वास ठेवा की तुम्ही घरात राहूनही फीटनेस संतुलित ठेवू शकता. तुम्हाला फक्त तुमच्या शरीराच्या हिशोबाने काम करण्याची आवश्यकता आहे. सध्याच्या काळात लोक अधिक वजन उचलण्याचा व्यायाम (Weight Lifting) करतात, ते मला समजत ही.”

“काही खेळाडूंसाठी हे काम करते. परंतु हे फीट आणि निरोगी राहण्याचा हा एकमेव मार्ग नाही. मी त्या भारतीय संघाबरोबर होतो. ज्यामध्ये अनेक दिग्गज खेळाडू होते. परंतु सर्वात चांगली गोष्ट होती ती म्हणजे, त्यांना माहिती होते की त्यांच्या शरीराला कशाची आवश्यकता आहे,” असेही रामजी यावेळी म्हणाले.

“मी सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar), एमएस धोनी (MS Dhoni), विरेंद्र सेहवाद (Virender Sehwag) आणि रोहित शर्माला (Rohit Sharma) अधिक वजन घेऊन ट्रेनिंग करताना पाहिले नाही. हे खेळाडू जिममध्ये जात होते. परंतु त्यामागे कारण असायचे. सचिन त्याच्या खांद्यावर आणि मनगटावर जास्त काम करायचा. याबाबतीत धोनीला बाजूला ठेवूया. कारण तो नैसर्गिक आहे. तुम्ही त्याच्या कारकीर्दीकडे असंच पाहू शकत नाही. त्याच्यावर खूप दबाव होता. परंतु त्याला किती दुखापती झाल्या, हे तुम्ही हाताच्या बोटावर मोजू शकता,” असे खेळाडूंबद्दल बोलताना रावजी म्हणाले.

“इतर खेळाडूंबद्दल बोलायचं झालं तर सेहवाग स्मार्ट होता. कारण फीट राहण्यासाठी काय हवे आहे आणि काय नको, हे त्याला माहिती होते. रोहितही असाच होता. तुम्ही रोहितचे षटकार पाहिले आहेत. मी म्हणू शकतो की तो युवराज सिंग (Yuvraj Singh) प्रमाणे लांब षटकार मारू शकतो. परंतु मी त्याला कधी जिममध्ये अधिक वजन उचलताना पाहिले नाही,” असेही रावजी पुढे म्हणाले.

ट्रेंडिंग घडामोडी-

-क्रिकेटमध्ये वापरले जाणारे वेगवेगळ्या प्रकारचे चेंडू

-माजी गोलंदाज म्हणतोय, माझं आणि पीटरसनचं अजिबात नव्हतं जमतं

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---