भारत आणि इंग्लंड यांच्यात ओव्हल येथे खेळल्या गेलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात रोहित शर्मा याला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. या सामन्याच्या पहिल्या डावात रोहित शर्माने फक्त ११ धावा केल्या होत्या. पण दुसऱ्या डावात त्याने १२७ धावा केल्या आणि भारतीय संघाला मोठ्या धावसंख्येकडे नेण्यात मोठी भूमिका बजावली. रोहितला त्याच्या डावासाठी सामन्याचा सर्वोत्तम खेळाडू म्हणून घोषित करण्यात आले. परंतु त्याने संघसहकारी शार्दुल ठाकूर याला या पुरस्काराचा खरा हक्कदार संबोधले आहे.
बोलताना म्हटले की, तो माझ्यापेक्षा जास्त या पुरस्काराला पात्र आहे.
सामनावीर म्हणून घोषित केल्यानंतर रोहित म्हणाला की, “मला मैदानावर अधिकाधिक वेळ घालवायचा होता. दुसरा डाव खास होता आणि माझ्यासाठी हे शतकही खास होते. कर्णधार विराटने केवळ फलंदाजांच्या प्रयत्नाचे कौतुक केले. पण ही एक सांघिक कामगिरी होती, म्हणून ते खूप महत्वाचे होते. मला आनंद आहे की माझ्या खेळीमुळे मी संघाला चांगल्या स्थितीत आणू शकलो. तीन आकडी धावसंख्येपर्यंत पोहचणे माझ्या मनात नव्हते. फलंदाजांवर दबाव होता आणि आम्ही परिस्थितीनुसार फलंदाजी केली. मला डावाची सुरुवात करण्याचे महत्त्व माहित आहे आणि यात मी योगदान दिल्याचा, मला आनंद आहे.”
या सामन्यात शार्दुल ठाकूरची कामगिरी खूप चांगली होती. विशेषत: त्याने दोन्ही डावांमध्ये ज्या प्रकारे फलंदाजी केली ते कौतुकास्पद होते. त्याने पहिल्या डावात ३६ चेंडूत ५७ धावा केल्या, तर दुसऱ्या डावात त्याने ६० धावांची महत्त्वपूर्ण खेळी खेळली. त्याच्या या खेळीने संघाच्या विजयात खूप मदत झाली.
गोलंदाजीबद्दल बोलायचे झाले तर त्याने पहिल्या डावात एक विकेट आणि दुसऱ्या डावात दोन अतिशय महत्त्वपूप्ण विकेट घेतल्या होत्या. शार्दुलची ही अष्टपैलू कामगिरी पाहून रोहित म्हणाला की, “शार्दुल माझ्यापेक्षा या पुरस्काराला अधिक पात्र होता.” ओव्हल मैदानावर आशियाई खेळाडू म्हणून, फक्त युनूस खान आणि रोहित शर्मा यांनीच सामनावीर पुरस्कार पटकावला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
“जर कोणी शार्दुल ठाकूरचा फॅन क्लब काढला, तर मला त्याचा पहिला सदस्य बनयला आवडेल”
भारतीय गोलंदाजांनी केली कमाल! तब्बल ४ फलंदाजांना क्लीन बोल्ड करत पहिल्यांदाच केला ‘असा’ पराक्रम