वेस्ट इंडिज विरुद्ध भारत संघात बुधवारपासून (दि. 12 जुलै) डॉमिनिका येथील विंडसर पार्क मैदानावर पहिल्या कसोटीला सुरुवात झाली. सामन्याच्या पहिल्या दिवशी भारतीय संघाने एकतर्फी वर्चस्व गाजवल्यानंतर, दुसऱ्या दिवशी देखील पहिल्या सत्रात दमदार सुरुवात केली. कर्णधार रोहित शर्मा याने आपल्या कसोटी कारकिर्दीतील पंधरावे अर्धशतक पूर्ण केले. यासह त्याने भारताचे सर्वकालीन महान सलामीवीर सुनील गावसकर व वीरेंद्र सेहवाग यांचे विक्रम मोडीत काढले.
भारतीय संघाने दुसऱ्या दिवशीचा खेळ बिनबाद 80 धावावरून सुरू केला. आधी यशस्वी जयस्वालने आपल्या कारकिर्दीतील पहिले अर्धशतक पूर्ण केले. तर, रोहितने देखील अधिक वेळ न दवडता अर्धशतकाला गवसणी घातली. हे त्याचे कसोटीतील पंधरावे अर्धशतक होते. यासह त्याने आपल्या कारकिर्दीत सलामीवीर म्हणून 102 व्या वेळी 50 पेक्षा जास्त धावा केल्या.
भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून सचिन तेंडुलकरने सर्वाधिक 120 वेळा 50 पेक्षा जास्त धावा केल्या होत्या. त्यानंतर आता दुसऱ्या क्रमांकावर रोहित आला आहे. भारताचे दिग्गज सलामीवीर राहिलेल्या वीरेंद्र सेहवाग आणि सुनील गावसकर यांनी प्रत्येकी 101 वेळा हा कारनामा करून दाखवलेला.
अर्धशतका नंतर न थांबता त्याने आपल्या कसोटी कारकिर्दीतील पंधरावे शतक झळकावले. मात्र, यानंतर पुढच्या चेंडूवर तो बाद होऊन परतला. बाद होण्यापूर्वी त्याने 221 चेंडूवर 103 धावांची खेळी केली. यामध्ये 10 चौकार व 2 षटकारांचा समावेश होता
(Rohit Sharma 102 Times Cross 50 Plus Mark As Opener Surpassed Sehwag And Gavaskar)
महत्वाच्या बातम्या –
भारतीय संघात असे काही पहिल्यांदाच! शुबमन गिलच्या ‘या’ निर्णयामुळे माजी क्रिकेटपटू हैराण
मैदानावर होती विंडीजची शेवटची जोडी, अचानक नाचायला लागला शुबमन; डान्स कॅमेऱ्यात कैद