जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा 2023चा अंतिम सामना भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात बुधवारपासून (दि. 7 जून) खेळला जात आहे. इंग्लंडच्या केनिंग्टन ओव्हल मैदानावर सुरू असलेल्या या सामन्यात भारतीय संघाची धुरा रोहित शर्मा याच्या खांद्यावर आहे. विशेष म्हणजे, डब्ल्यूटीसी अंतिम सामना खेळण्याची ही भारताची सलग दुसरी वेळ आहे. यापूर्वी न्यूझीलंडविरुद्धच्या अंतिम सामन्यात विरोट कोहली याच्या नेतृत्वाखाली भारताला पराभव पत्करावा लागला होता. अशात रोहितच्या नेतृत्वाखाली भारत पहिल्यांदा कसोटी चॅम्पियन बनण्याचा प्रयत्न करेल. यादरम्यान रोहितने खास विक्रमही रचला आहे.
रोहित शर्मा पाचवा कर्णधार
रोहित शर्मा (Rohit Sharma) याची कोणत्याही आयसीसी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्व करण्याची ही पहिलीच वेळ ठरली आहे. अशी कामगिरी करणारा रोहित शर्मा भारताचा पाचवा कर्णधार (Rohit Sharma Fifth India Captain) बनला आहे. सर्वात पहिला हा मान विश्वविजेते कर्णधार कपिल देव (Kapil Dev) यांना 1983मध्ये मिळाला होता.
सन 2003मध्ये वनडे विश्वचषकात सौरव गांगुली (Sourav Ganguly) अशी कामगिरी करणारा दुसरा भारतीय कर्णधार बनला होता. तसेच, एमएस धोनी (MS Dhoni) याने 2007च्या टी20 विश्वचषकात आणि 2011च्या वनडे विश्वचषकाव्यतिरिक्त चॅम्पियन ट्रॉफीतही भारताचे नेतृत्व केले आहे. तसेच, विराट कोहली याने 2017च्या चॅम्पियन्स ट्रॉफी आणि 2021च्या डब्ल्यूटीसी अंतिम सामन्यातभारतीय संघाचे नेतृत्व करत होता. यामध्ये भारताला पराभूत व्हावे लागले होते.
आयसीसी स्पर्धांच्या अंतिम सामन्यातील कर्णधारपदाची आकडेवारी
आयसीसी स्पर्धांमधील कर्णधारपदाची आकडेवारी पाहिली, तर धोनीने 4 अंतिम सामन्यात भारताचे नेतृत्व केले आहे. त्याने 2007 टी20 विश्वचषक, 2011चा वनडे विश्वचषक आणि 2013ची चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे. एका अंतिम सामन्यात त्याच्या नेतृत्वातील भारतीय संघाला पराभवाचा धक्का सहन करावा लागला होता.
कपिल देव यांनी सर्वप्रथम कोणत्याही भारतीय संघाला आयसीसी स्पर्धांच्या अंतिम सामन्यात पोहोचवून गौरव मिळवला होता. सन 1983मध्ये दोन वेळच्या जागतिक चॅम्पियन असलेल्या वेस्ट इंडिज संघाला पराभूत करून भारतीय संघाला पहिली आयसीसी ट्रॉफी जिंकून देऊन इतिहास रचला होता.
सौरव गांगुली याच्या नेतृत्वात भारतीय संघाने सन 2003मध्ये आयसीसी वनडे विश्वचषकात भारताला स्थान मिळवून दिले होते. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवासह कर्णधाराचे भारताला दुसऱ्यांदा जागतिक चॅम्पियन बनवण्याचे स्वप्नही भंगले होते. गांगुलीने 3 आयसीसी अंतिम सामन्यात भारताचे कर्णधारपद भूषवले होते, ज्यात एका चॅम्पियन्स ट्रॉफीत संयुक्त विजेतेपद भूषवले, तर इतर दोन विश्वचषकांमध्ये पराभूत व्हावे लागले. (rohit sharma 5th indian captain in icc event final know about another indians)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
टॉस रोहितने जिंकला अन् विक्रम विराटच्या नावावर झाला, पाहा नक्की काय घडलं?
ओडिसा रेल्वे अपघातग्रस्तांना WTC फायनलमध्ये वाहिली गेली श्रद्धांजली, भारतासह ऑस्ट्रेलियन संघानेही व्यक्त केला शोक