---Advertisement---

राहुल, रिंकूला टीममधून का वगळलं? हार्दिक पांड्याची निवड कशामुळे झाली? रोहित-आगरकरनं दिली सर्व प्रश्नांची उत्तरं

On: गुरूवार, मे 2, 2024 7:50 PM
---Advertisement---

या वर्षी होणाऱ्या टी20 विश्वचषकासाठी भारतीय संघ जाहीर झाला आहे. आता भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा यानं याबाबत मुंबईत पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेला बीसीसीआयचे मुख्य निवडकर्ते अजित आगरकरही उपस्थित होते.

रोहित शर्माला आयपीएलमधील कर्णधारपदावरून हटवल्यानंतर मुंबई इंडियन्स फ्रँचायझीनं हार्दिक पांड्याकडे नेतृत्व सोपवलं. यावर बोलताना रोहित शर्मा म्हणाला की माझ्यासाठी हे काही नवीन नाही. मी यापूर्वीही अनेक कर्णधारांच्या हाताखाली खेळलो आहे. रोहित म्हणाला, “मी कर्णधार होतो. नंतर कर्णधार नव्हतो, आता पुन्हा कर्णधार बनलो. हा जीवनाचा भाग आहे. सर्व काही आपल्या मार्गानं जाणार नाही. माझ्या आयुष्यात यापूर्वीही मी वेगवेगळ्या कर्णधारांच्या हाताखाली खेळलो होतो. एक खेळाडू म्हणून जे आवश्यक आहे ते करण्याचा मी नेहमीच प्रयत्न केला आहे.”

अजित आगरकर म्हणाले, ‘रोहित हा उत्तम कर्णधार आहे. एकदिवसीय विश्वचषक आणि टी20 विश्वचषक या दरम्यानच्या कालावधीत आम्हाला काही निर्णय घ्यावे लागले. मला माहित आहे की हार्दिकनं काही मालिकांमध्ये नेतृत्व केलंय. पण रोहितनं कमाल केली आहे.

पत्रकार परिषदेत केएल राहुलला विश्वचषक संघात स्थान का मिळालं नाही? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर आगरकर म्हणाले, “केएल हा उत्तम खेळाडू आहे. आम्ही मधल्या फळीत फलंदाजी करणाऱ्या खेळाडूंचा विचार करत आहोत. केएल टॉप ऑर्डरमध्ये फलंदाजी करतो. तर ऋषभ पंत पाचव्या क्रमांकावर खेळत आहे. संजू सॅमसनकडेही खाली खेळण्याची क्षमता आहे.”

अष्टपैलू शिवम दुबेबाबत रोहित म्हणाला, “आमचे टॉप ऑर्डरचे फलंदाज चांगली कामगिरी करत आहे. आम्हाला मधल्या षटकांमध्ये मोकळेपणानं खेळणारा खेळाडू हवा आहे. आम्ही दुबेची आयपीएलमधील कामगिरीच्या आधारे निवड केली. आम्ही त्याची निवड केली, परंतु प्लेइंग-11 मध्ये त्याला जागा मिळेल याची खात्री नाही.”

भारतासाठी टी20 मध्ये दमदार करणाऱ्या रिंकू सिंहला राखीव खेळाडूंमध्ये ठेवण्यात आलं आहे. त्याला 15 सदस्यीय संघात स्थान मिळालेलं नाही. यावर रोहित म्हणाला, “मला वाटतं यात रिंकूची चुकी नाही. तो आमच्यासोबत प्रवास करणार आहे. मला माहित आहे की त्याच्यासाठी हे थोडं कठीण आहे. संघाच्या संतुलनामुळे तो मुकला. आम्हाला अतिरिक्त स्पिनरची गरज होती. मला संघात 4 फिरकीपटू हवे होते. मी इथे कारण सांगणार नाही, अमेरिकेत ते सांगेन.”

या आयपीएलमध्ये विराट कोहली त्याच्या स्ट्राईक रेटमुळे ट्रोल झाला आहे. याबाबत आगरकर यांना विचारलं असता ते म्हणाले, “अनुभव खूप महत्त्वाचा असतो. विराट कोहलीच्या स्ट्राईक रेटबाबत कधीही चर्चा झाली नाही. यावर जास्त विचार करण्यात अर्थ नाही.” दुसरीकडे, संघात अष्टपैलू हार्दिक पांड्याच्या निवडीबाबत आगरकर म्हणाले, “जोपर्यंत तो तंदुरुस्त आणि उपलब्ध आहे, आम्हाला तो संघात नेहमीच हवा होता. त्याबद्दल कधीही शंका नव्हती.”

टी20 विश्वचषकासाठी भारतीय संघ :

रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत (यष्टीरक्षक), शिवम दुबे, हार्दिक पांड्या (उपकर्णधार), रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, युजवेंद्र, चहल, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), मोहम्मद सिराज.

राखीव खेळाडू – शुबमन गिल, रिंकू सिंह, खलील अहमद, आवेश खान.

टी20 विश्वचषक गट –

अ गट – भारत, पाकिस्तान, आयर्लंड, कॅनडा, अमेरिका
ब गट – इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, नामिबिया, स्कॉटलंड, ओमान
क गट – न्यूझीलंड, वेस्ट इंडिज, अफगाणिस्तान, युगांडा, पापुआ न्यू गिनी
ड गट – दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, बांगलादेश, नेदरलँड, नेपाळ

महत्त्वाच्या बातम्या – 

रिंकू सिंह ठरला ‘इम्पॅक्ट प्लेअर’ नियमाचा बळी? वर्ल्ड कपच्या टीममध्ये स्थान न मिळण्याला केकेआरचं मॅनेजमेंट जबाबदार?

लखनऊ, हैदराबादचा एकही खेळाडू टी20 विश्वचषक संघात नाही! जाणून घ्या कोणत्या संघातील किती खेळाडूंना मिळालं स्थान

टीम इंडियासाठी ‘गेम चेंजर’ ठरू शकतो हार्दिक पांड्या! जाणून घ्या का मिळाली टी20 विश्वचषकात संधी?

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---